Sarthi Pune | प्रत्येक जिल्ह्यात संगणक आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण देणार – ‘सारथी’चे अध्यक्ष अजित निंबाळकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sarthi Pune | खाजगी क्षेत्रातही युवक-युवतींनी यशस्वी होण्यासाठी त्यांना आवश्यक असलेले संगणक आणि व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण प्रत्येक जिल्ह्यात देऊन सारथी संस्थेचे कार्य (Sarthi Pune) अधिक व्यापक करण्यात येईल, असे प्रतिपादन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (Chhatrapati Shahu Maharaj Research Training and Human Development Institute) पुणेचे अध्यक्ष अजित निंबाळकर (Ajit Nimbalkar) यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ प्रकाशन सोहळा आणि सारथी संस्थेतर्फे आयोजित संघ लोकसेवा आयोग परीक्षा-2020 यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच विद्यावाचस्पती पदवीधारकांच्या सत्कार समारंभात बोलत होते. कार्यक्रमाला माजी अपर मुख्य सचिव नानासाहेब पाटील (Nanasaheb Patil), जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (dr rajesh deshmukh collector pune), संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे (Ashok Kakde), संचालक उमाकांत दांगट (Umakant Dangat), श्रीमंत कोकाटे (shrimant kokate) आदी उपस्थित होते.

निंबाळकर म्हणाले, संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) लेखी परीक्षेची सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. मात्र शासकीय सेवेसोबत खाजगी क्षेत्रातही यश संपादन करण्याची युवकांची क्षमता आहे. त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी सारथीचे कार्य अधिक विस्तारण्याचे नियोजन आहे. युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. (Sarthi Pune)

संघ लोकसेवा आयोग परीक्षा-2020 मध्ये (UPSC) यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी आपण जनसेवक आहोत याची जाणिव ठेवीत संविधान आणि देशाविषयी निष्ठा बाळगून काम करावे. कायद्याचा अभ्यास करण्यासोबत लोकप्रतिनिधींचा सन्मानदेखील ठेवावा. त्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी करून घ्यावा. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात वरिष्ठांसोबत कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून मिळणारे प्रशिक्षण अधिक उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.

 

पाटील म्हणाले, युवकांनी ज्ञान, क्षमता आणि महत्वाकांक्षेच्या आधारे यश खेचून आणावे.
त्यासाठी सारथी संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा त्यांनी लाभ घ्यावा.
शेती क्षेत्रातील अडचणी लक्षात घेता शिक्षणाच्या साह्याने इतर क्षेत्रात यश मिळविण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न करावे.
शिक्षण आणि प्रशिक्षणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षि शाहू महाराज यांचा दृष्टीकोन स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.

मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
तसेच युपीएससी परीक्षेत यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
कमी कालावधीत विद्यावाचस्पती पदवी मिळविणाऱ्या सारथीच्या छात्रवृत्तीधारकांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना स्पर्धा परीक्षेतील यशात सारथी संस्थेचे महत्वाचे योगदान असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात काकडे म्हणाले, संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सारथीचे 22 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
मराठा आणि कुणबी समाजातील 705 विद्यार्थ्यांना PhD साठी फेलोशिप देण्यात आली असून एका वर्षात 21 कोटी वितरीत करण्यात आले आहेत.

कार्यक्रमाला सारथीचे विद्यार्थी, त्यांचे पालक, पीएचडी मार्गदर्शक उपस्थित होते.

 

Web Title :- Sarthi Pune | Ajit Nimbalkar, President of Sarathi will impart computer and personality development training in every district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rakhi Sawant | 2 वर्षानंतर भेटलेल्या पतीसोबत राखी सावंत Bigg Boss मध्येच करणार ‘सुहागरात’

Best Life Insurance Policy Plans | कोणत्या ‘आयुर्विमा पॉलिसी’चा प्लान तुमच्यासाठी राहील योग्य, जाणून घ्या बेस्ट ‘लाईफ इन्श्युरन्स’ प्लान

Corona-Omicron Variant | घातक व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत ‘सील’ होणार