#YogaDay 2019 : ‘सर्वांगासन’ केल्याने मिळते मनःशांती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आजच्या या ताणतणावाच्या युगात माणसाला शांती आणि विश्रांती या दोन्ही गोष्टींची खूप गरज असते. मात्र या धावत्या युगात आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट करणे मानवाला शक्य नाही. मात्र या धावपळीच्या युगात योगा हा असा प्रकार आहे ज्यामुळे माणूस मानसिक शांती आणि शारीरिक शांती या दोन्ही गोष्टी मिळवू शकतो. त्यामुळे योगा हा किती महत्वाचा आहे हे माणसाने समजून घेणे फार गरजेचे आहे.

अनेकांची आपल्या कामाच्या पद्धतीमुळे चिडचिड होते. या सगळ्यात तुम्ही योगामुळे सुधार करू शकता आणि सर्वांगासन हे आसन या सगळ्यात मोलाची भूमिका पार पडत असते. या आसनात संपूर्ण शरीराचा तोल खांद्याच्यावर सांभाळला जातो. हे एक पद्मसाधनातील आसन आहे. नावाप्रमाणेच या आसनामध्ये सर्व शरीराचे कार्य प्रभावित होते. या आसनामुळे उच्च दर्जाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त होते. जर तुमचे ब्लड प्रेशर नॉर्मल नाही आहे, तुम्हाला काचबिंदू आहे, तुमच्या डोळ्याचे पटल वेगळे झालेले आहे, तर या आसनाचा तुम्हाला फार मोठा उपयोग होईल.

आसन करण्याची पद्धत

जमिनीवर अंथरलेल्या आसनावर शांत चित्त होऊन झोपा. श्वास बाहेर सोडून कंबरेपर्यंतचे दोन्ही पाय सरळ आणि एकमेकांना चिकटलेल्या स्थितीत वर उचला. नंतर पाठीचा भागही वर उचला. दोन्ही हातांनी कंबरेला आधार द्या. हाताचे कोपरे जमिनीला चिकटलेले असावेत. मान आणि खांद्यांच्या बळावर संपूर्ण शरीर वर सरळ ताठ उचला. हनुवटी छातीस लावलेली असावी. दोन्ही पाय आकाशाकडे असावेत. दृष्टी दोन्ही पायांच्या अंगठ्यावर किंवा डोळे मिटून श्वास दीर्घ स्वाभाविक चालू द्या. सुरुवातीला तीन ते पाच मिनिटे हे आसन करावे. भविष्यात तुम्ही या आसनाचा वेळ वाढवू देखील शकता.

या आसनामुळे होणारे फायदे

सर्वांगासन केल्याने अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला मिळू शकतात. ते पाहूया पुढीलप्रमाणे

१)थायरोईड आणि पॅराथायरोईड ग्रंथींना चालना देते आणि त्यांचे कार्य कार्य सुधारते.
२)हात आणि खांदे बळकट होतात आणि पाठीचा कणा लवचिक बनतो.
३)मेंदूला अधिक रक्तपुरवठा मिळाल्यामुळे त्याचे चांगले पोषण होते.
४)आपले डोळे तेजस्वी होतात तसेच चेहरा देखील तेजस्वी बनतो.
५)आपले मन शांत होते. तसेच मानसिक समाधान लाभते.

सिनेजगत

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला शाहिद कपूरसोबत ‘रात्र’ घालवायचीय !

‘त्या’ मारहाण प्रकरणी अभिनेता विद्युत जामवालबाबत कोर्टाने दिला १२ वर्षांनी ‘हा’ महत्त्वाचा निकाल

‘या’ अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप करणारी महिला अटकेत

 

Loading...
You might also like