‘सरवना’ भवनचे मालक ‘डोसा किंग’चे चेन्नईत ‘निधन’, गाजलं होतं त्यांचं ‘हे’ हत्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण भारतील रेस्टाॅरंट ‘सरवना भवन’चे संस्थापक पी. राजगोपाल यांचे एका खासगी रुग्णालयात उपचार घेताना सकाळी निधन झाले. त्यांना हत्येच्या एका जुन्या प्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा मिळाली होती, त्यानंतर मागील आठवड्यातच राजगोपाल यांनी पोलिसांना स्वत:ला आत्मसमर्पित केले होते.

डोसा किंग म्हणून प्रसिद्ध

डोसा किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या ७१ वर्षीय राजगोपाल यांनी मंगळवारी सरकारच्या स्टेनली रुग्णालयातून मद्रासच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यासाठी जेल वार्डमध्ये ठेवले होते.

आपला कर्मचारी प्रिंस संतकुमारच्या हत्या प्रकरणी आजीवन कारावासाची शिक्षा झालेल्या राजगोपाल यांना ९ जुलैला सर्वोच्च न्यायालयासमोर आत्मसमर्पण करण्यासाठी थोडा वेळ मागितला, ज्याला रद्द करण्यात आले, त्यानंतर त्यांनी आत्मसमर्पण केले. तुरुंगात रवानगी करण्यात आल्यानंतर त्यांनी तक्रार केली की त्यांना चक्कर येत आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काय आहेत प्रकरण

राजगोपाल ज्योतिषाने सांगितल्यानंतर एका मुलीशी लग्न करु इच्छित होता. त्यावेळी राजगोपालला दोन पत्नी होत्या आणि त्यामुळे तरुणीने त्यांना नकार दिला होता. या तरुणीने नंतर १९९९ मध्ये संतकुमारशी लग्न केले होते. २००१ मध्ये या दाम्पत्याला राजगोपालकडून धमकी देण्यात येत होती की तुम्ही लग्न मोडा. या दाम्पत्याने पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर संतकुमारचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर संतकुमारची हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह जंगलात टाकला होता.

आजन्म तुरुंगवास

या प्रकरणात राजगोपाल यांना गुन्हेगार ठरवण्यात आल्यानंतर त्याला १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्याने न्यायालयात याचिका दाखल करण्यता आली होती, मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळत त्याला आजन्म कारावासाची शिक्षा दिली होती. त्यानंतर त्याला आत्मसमर्पणाची तारिख ७ जुलै सांगण्यात आली होती.

आजारपणाचे कारण देऊन आत्मसमर्पणाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती त्यांच्याकडून करण्यात आली, मात्र या विनंती देखील फेटाळण्यात आली होती.