Sassoon Hospital | बेवारस रुग्णांना ससून हॉस्पिटलला पाठवू नका, इतर सरकारी रुग्णालयात पाठवा; ससून प्रशासनाचे आवाहन

Sassoon Hospital | dont send destitute patients to sassoon send to other government hospitals urges sassoon administration

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sassoon Hospital | मागेच ससून रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांना निर्जन स्थळी सोडत असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकारानंतर ससूनच्या दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आता ससून रुग्णालयाच्या प्रशासनाकडून बेवारस रुग्णांना ससूनमध्ये न आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ससून रुग्णालय हे टर्शरी केअर रुग्णालय आहे. येथे विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण आणि गुंतागुंतीच्या रुग्णांवर उपचार होणे अपेक्षित आहे. तसेच जे उपचार इतरही सरकारी रुग्णालयात होतात ते रुग्ण इथे आणणे अपेक्षित नाही. त्यापैकीच काही बेवारस पेशंटही असतात. ज्यांना किरकोळ दुखापतीमुळे ससून रुग्णालयात आणले जाते.

अशा रुग्णांना थेट ससूनमध्ये न आणता जवळच्या सरकारी रुग्णालयातदेखील उपचार करण्यात यावेत असे आवाहन ससून रुग्णालय प्रशासनाने केले आहे. ससून रुग्णालयातून नुकतेच एका बेवारस रुग्णाला मनोरुग्णालयाच्या समोर सोडून दिल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यामुळे रुग्णालयावर टीका झाली.

मात्र, रुग्णालयाच्याही काही बाजू आहेत त्या देखील समजून घेणे आवश्यक आहे. अजूनही रुग्णालयात असे ४८ रुग्ण आहेत. त्यांचा भार येथील वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांच्यावर पडत आहे. हे सर्व ओझे ससूनवर पडत आहे.

परंतु, असे अनेक रुग्ण आहेत ज्यांचा उपचार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच महापालिकेच्या सर्वसामान्य रुग्णालयांत आणि पिंपरी-चिंचवडच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये होणे शक्य आहे.

मात्र, सर्वच रुग्ण बेधडकपणे ससूनमध्ये पाठविले जातात. त्यामुळे येथे पेशंटची संख्या वाढते. बेवारस पेशंट ससूनला पाठविण्याची सवय वर्षानुवर्षे पोलिसांसह डायल १०८ यांनाही लागलेली आहे. तशीच ती इतर शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांनाही लागलेली आहे.

पिंपरी-चिंचवड येथे देखील महापालिकेचे मोठे रुग्णालय आहे. येथे बेवारस रुग्णांचा उपचार होऊ शकतो. परंतु, वायसीएमसारखे रुग्णालय (YCM Hospital) देखील बेवारस पेशंटला दाखल न करता थेट ससूनला पाठवून देते. जिल्हा रुग्णालयाचीही परिस्थिती वेगळी नाही.

त्यामुळे आम्ही किती भार सहन करायचा असा प्रश्न ससून रुग्णालयाकडून विचारला जात आहे. या बेवारस पेशंट सोबत कोणी नसल्याने, तसेच त्यांना जर चालता येत नसल्यास त्यांचे कपडे बदलण्यापासून वैयक्तिक स्वच्छतेसाठी मदत करण्याचे काम ससून रुग्णालयातील कर्मचारी करत असतात.

एकतर येथे प्रत्येक वॉर्डमध्ये ६० ते ७० रुग्णांमागे एक ते दोनच परिचारिका असतात आणि एक ते दोन सेवक असतात. ही संख्या खूप कमी आहे. त्यामुळे येथील मनुष्यबळावर ताण येतो, याकडे शासन, तसेच इतर लक्ष घालतील का असा, प्रश्न रुग्णालयाकडून विचारला जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून

Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी बॅंक कर्मचाऱ्याला जामीन मंजूर

Loni Kalbhor Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी

Ajit Pawar NCP Baramati | ‘येत्या 8 दिवसात पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्या’; अजित पवारांचा आदेश; खांदेपालट होण्याचे संकेत

Total
0
Shares
Related Posts
Pune PMC News | Katraj Kondhwa road work to be completed by March 2026 by acquiring land as per special law; Decision taken in meeting with District Collector - Information from Municipal Commissioner Naval Kishore Ram

Pune PMC News | विशेष कायद्यानुसार भूसंपादन करून कात्रज कोंढवा रस्त्याचे काम मार्च 2026 अखेर पूर्ण करणार; जिल्हाधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत निर्णय – महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती