ससून रुग्णालय; बलात्कार पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी महत्वाची आहे का ?

पिंपरी-चिंचवड :  पोलीसनामा आॅनलाईन – सांगवी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याला पुण्यातील ससून रुग्णालयाचा वेगळाच अनुभव आला आहे. एका महिला डॉक्टरला बलात्कार पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करायला सांगितली. मात्र हे काम येवढ तातडीचे आणि महत्वाचे आहे का असा सवाल करत तुम्ही पीडित महिलेला सकाळी पाठवायचं ना असा संतापजनक सवाल केल्याचा आरोप महिला पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. त्यामुळे ससून रुग्णालयातील हलगर्जीपणा समोर आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, सांगवी पोलीस ठाण्यात बलात्कार पीडित ३० वर्षीय महिलेने तक्रार नोंदवली त्यानुसार आरोपी नेताजी विश्वनाथ सूर्यवंशी याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही तक्रार मध्यरात्री एक च्या सुमारास घेण्यात आली. पीडित महिलेवर कासारवाडी येथील लॉजवर आरोपी नेताजीने बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिला पोलिसात गेल्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि महिलेची वैद्यकीय चाचणी करायची असल्याने तिला सांगवी पोलिसांनी ससून रुग्णालयात घेऊन गेले. परंतु तेथील महिला डॉक्टरने वैद्यकीय चाचणी महत्वाची आहे का असा संतापजनक सवाल महिला पोलीस अधिकाऱ्याला करत चाचणीला टाळाटाळ केली.तुम्ही पीडित महिलेला सकाळी पाठवू शकता नव्हता का? आत्ताच तातडीचे आहे का असे अनेक सवाल महिला डॉक्टरने केल्याचा आरोप आहे.असे अनुभव वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना आलेले असल्याचे महिला पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे बलात्कार पीडित महिलेला आणि पोलीस अधिकाऱ्याला अशी प्रकारची वागणूक मिळत असेल तर नक्कीच गंभीर बाब आहे.रुग्णालयात सर्व सामान्य रुग्णांचे काय हाल होत असतील याची कल्पना न केलेलीच बरी.तसेच महिला डॉक्टरवर कारवाई होणार का असा सवाल पोलीस कर्मचाऱ्यामधून केला जात आहे.