Sasubai Jorat Marathi Movie | मल्टीस्टारर धमाल कॉमेडी “सासूबाई जोरात’२६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

संदीप पाठक, सयाजी शिंदे, मोहन जोशी, विजय पाटकर यांच्या प्रमुख भूमिका !

पोलीसनामा ऑनलाइन – Sasubai Jorat Marathi Movie | सासू-सुनेचं नातं विळ्याभोपळ्यासारखं असतं. पण सासू आणि जावयाच्या धमाल नात्याचं चित्रण सासूबाई जोरात या चित्रपटात करण्यात आलं आहे. सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांनी लेखन-दिग्दर्शन केलेला आणि दमदार स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २६ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. (Sasubai Jorat Marathi Movie)

प्रभू शांती फिल्म प्रॉडक्शननं “सासूबाई जोरात” हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांनी या चित्रपटाच्या लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन आणि निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर तेजस काळोखे यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन केलं आहे. चित्रपटात सयाजी शिंदे, संदीप पाठक, विजय पाटकर, मोहन जोशी, सुनील गोडबोले, उषा नाईक, आशा बिराजदार, विधी कुडिया, सिमरन क्षीरसागर, मिलिंद ढगे, सुयश लातूरे आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. (Sasubai Jorat Marathi Movie)

 

“सासुबाई जोरात” ही गोष्ट आहे आधुनिक सासू आणि तिच्या आधुनिक जावयाची. या सासूला तिच्या नवऱ्याचीही चिंता नाही. त्याशिवाय ती जावयाशीही अत्यंत कठोरपणे वागते. या सासू आणि जावई यांच्यात काय होतं याची धमाल गोष्ट सासूबाई जोरात या चित्रपटात मांडण्यात आली आहे. त्यामुळे सासू-सुनेच्या अनेक प्रकारच्या लढाया आजवर चित्रपट मालिकांतून पाहिल्यानंतर आता सासु-जावयाची धमाल गोष्ट चित्रपटात पाहणं हा मनोरंजक अनुभव ठरेल यात शंकाच नाही. त्याशिवाय चित्रपटात उत्तम स्टारकास्ट असल्यानं हा चित्रपट अभिनयाची मेजवानीच ठरेल.

Web Title :-  Sasubai Jorat Marathi Movie | Multistarrer Dhamal Comedy Saasubai Jorat from May 26 across Maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – वर्षभरापासुन फरारी असलेल्या आरोपीला अटक

Railway Summer Special Trains For Konkan | Pune : या उन्हाळी सुट्टीत करा कोकण वारी; मध्य रेल्वच्या कोकणासाठी विशेष गाड्या

IPS Vishwas Nangare Patil | आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आवाहन; म्हणाले – ‘माझ्या नावाने बनावट खातं, सावध रहा’

Sunny XI Karandak | ‘सनी इलेव्हन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! आर्यन क्रिकेट क्लब संघाचा सलग दुसरा विजय !!

Basava Seva Pratishthan | महात्मा बसवण्णा स्थापित ‘अनुभव मंटप’ ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी;
प्रसिध्द व्याख्याते बसवकुमार पाटील यांचे प्रतिपादन

Accident News | लग्नाला जाताना झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू; 5 महिला आणि 2 मुलांचा समावेश

Mahavitaran Director Yogesh Gadkari | महावितरणच्या संचालक (वाणिज्य) पदी योगेश गडकरी