‘ससुराल सिमर का’ फेम आशिष रॉय रुग्णालयात भरती, उपचारासाठी नाहीत पैसे, बर्थडेच्या दिवशी मागितली मरण्याची दुवा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अलीकडेच टीव्ही अॅक्टर मनमीत ग्रेवाल यानं काम नसल्यानं आणि डिप्रेशनमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. शुटींग बंद असल्यानं कलाकारांनी मोठी आर्थिक अडचण झाली आहे. यानंतर आता अशी माहिती आहे की, ससुराल सिमर का फेम आशिष रॉय यांनाही रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. आशिष सध्या आयसीयुमध्ये आहेत. त्यांची स्थिती खूप गंभीर आहे. त्यांच्याकडे उपचार करण्यासाठी देखील पुरेसे पैसे नाहीत.

कुछ रंग प्यार के मालिकेत काम करणाऱ्या आशिष रॉय यांच्या किडन्या खराब झाल्या आहेत. त्यांच्या शरीरात जवळपास 9 लिटर पाणी जमा झालं होतं. अनेक अवयव सुजले होते. कोरोनामुळं कोणतंही हॉस्पिटल त्यांना अॅडमिट करून घ्यायला तयार नव्हतं. खूप विनंती केल्यानंतर एका हॉस्पिटलनं भरती करून घेतलं.

https://twitter.com/30Kumaar/status/1262629225158324224?s=20

आशिष यांनी सांगितलं की, वाईट काळात कोणीच त्यांना मदत करत नाही. आशिष म्हणतात, ट्र्रीमटेंटवर आतापर्यंत लाखो रुपये खर्च झाले आहेत. आता माझ्याकडे पैसे नाहीत. कोणी मदत करू शकत असेल तर सांगा.” 2019 साली आशिषला पॅरलिटीक अॅटक आला होता. म्हणजेच त्यांना लखवा मारला होता.

आशिष यांनी सोशलवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात लिहलं आहे की, “सकाळची कॉफीदेखील बिना साखरेची आहे. ही स्माईल मजबुरीची आहे. देवा मला उचल.”