सासवड नगरपालिकेची ‘वीर बाजी पासलकर’ शाळा अस्वच्छ

पोलीसनामा ऑनलाइन :  सासवड नगरपालिकेची ” वीर बाजी पासलकर “शाळा अस्वच्छ परिसर सर्वत्र गवत वाढलेले स्वच्छतागृह एकच तेही अस्वच्छ, शाळेचे गेट व रस्ता यामध्ये उंचवटा नसल्याने सर्व पावसाचे पाणी शाळेत येते, त्यामुळे महत्वाची रजिस्टर भिजून खराब झाली, शाळांमध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत मुलांच्या व शिक्षकांच्या  आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पट संख्या वाढीसाठी बस सेवा सुरू करण्यासाठी व शाळेत वर्गात C C TV कॅमेरे बसवण्यासाठी गेली 5 वर्ष नगरपालिकेस सूचना करीत आहे. स्वच्छता अभियानाचे बक्षीस मिळण्यासाठी कोट्यवधी रुपये रंग रंगोटीवर खर्च करण्यापेक्षा शाळांवर खर्च  करणे गरजेचे आहे  कमी अधिक सर्वच नगरपालिकांच्या शाळांची दयनीय अवस्था आहे.

Visit : Policenama.com