सासवड पोलिसांची कारवाई ! नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सासवड येथील 3 हाॅटेल सील

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन – लाॅकडाऊन काळात , शासनाने ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन न केल्याने पुरंदर तालुक्यातील सासवड येथील,हाॅटेल मोहिनी,अस्मिता वडापाव केंद्र, व सेजल हाॅटेल काळेवाडी यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी दिली.

या बाबतची हकीगत अशी की, मा.मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य व आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय मुंबई व मा. जिल्हाधिकारी साहेब पुणे जिल्हा यांचे आदेश क्रमांक , जि. का. / क्र. आ. व्य. / का.वि. / ९२२ / २०२१ / यांचे १४ / ५ / २०२१ अधिसुचने नुसार, प्रतिबंधात्मक आदेश पारित केले असताना, देखील मोहिनी हाॅटेल सासवड , अस्मिता वडेवाले सासवड व सेजल हाॅटेल काळेवाडी, यांच्यावर वारंवार दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.

कारवाई करुन देखील ते त्यास जुमानत नव्हते म्हणुन त्यांच्या आस्थापना सील करण्याबाबतचा रिपोर्ट पाठविण्यात आला होता. तालुका दंडाधिकारी साहेब तथा तालुका सहाय्यक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी वरील आस्थापना सील करण्याबाबतचा आदेश‌ पारीत केल्याने, दि. २१ / ५ / २०२१ रोजी, हाॅटेल मोहिनी, अस्मिता वडेवाले सासवड , व सेजल हाॅटेल काळेवाडी, या तिन्हीही आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी तथा ,डि. वाय.एस.पी. भोर विभाग सासवड धनंजय पाटील, व सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप,यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे,पोलीस नायक मुजावर ,पोलीस काॅन्सटेबल नांगरे व महसुली प्रशासनाच्या वतीने संयुक्त रित्या करण्यात आली. यापुढे देखील लाॅकडाऊन काळात नियमांचा भंग करणाऱ्या हाॅटेल दुकाने व इतर आस्थापना वर कारवाई करुन ,सदर आस्थापना सील करण्यात येतील अशी माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी दिली.