फरार आरोपीस सासवड पोलीसांकडून शिताफिने अटक

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – सासवड पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई फरार झालेला आरोपी पकडण्यास सासवड पोलीसांना यश.

सासवड पोलीस स्टेशन गर . नं . ४४९ / २०१९ भा . द . वि . क . ३०७ , ३९५ ३६४ ( अ ) , १४३ , १४७ , १४८ , १४९ हा गुन्हा दिनांक ०९ / १२ / २०१५ रोजी १७ . ३० ते १८ . ०० वा . चे दरम्याने मोजे चांबळी गांवचे हददीत पांध ” नं . १ रोडवर व डोंगरावरील गायरानात फिर्यादी महेश भैरवनाथ कामठे , वर २५ धंदा शेती राहणार चांबळी ता पुरंदर जि . पुणे हा १ लाख रूपये खंडणी देत नाही. याकारणावरून आरोपी नामे
१ ) दिगंबर दशरथ शेंडकर , रा चांबळी , ता . पुरंदर , जि . पुणे २ ) आदित्य तानाजी चौधरी , वय १९ , राहणार नारायणपेठ , ता . पुरंदर , जि . पुणे . ३ ) अनिकेत महादेव काळे , वय १९ , रा सोनोरी , ता . पुरंदर जि . पुणे ४ ) उध्दव कानिफनाथ शेंडकर वय १८ वर्षे , राहणार चांबळी , ता . पुरंदर , जि . पुणे ५ ) आशिष रामचंद्र शेंडकर , वय १८ वर्षे राहणार चांबळी , ता पुरंदर , जि . पुणे ६ ) सागर वसंत काळे , वय १९ , राहणार सोनोरी , ता . पुरंदर , जि . पुणे ७ ) संकेत उर्फ संक्या महादेव उर्फ मोहन कुंभार वय १९ , राहणार जयमहाराष्ट्र चौक सासवड , ता . पुरंदर जि . पुणे ८ ) अभिजीत विजय भिलारे वय १९ , भिलारवाडी हातवे बुा , ता . । भोर , जि . पुणे ९ ) संतोष बाळासाहेब पवार , वय १९ , राहणार वाल्हा , ता . पुरंदर , जि . पुणे ( इतर ४ ते ५ अनोळखी ) यांनी मोटार सायकलवर बसवून जबरदस्तीने पळवून नेवून त्यास हाताने लाथाबुक्यानी काठीने व कमरेच्या चामडी पटयांनी जबर मारहणण करून त्यास जीवे ठार मारण्याच्या उददेशाने दिगंबर शेंडकर याने मोठा दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात घालत असताना पोलीस तेथे वेळेवर पोहचल्याने व पोलीसांनी फिर्यादीचा जीव वाचविण्याकरीता त्यांचेकडील  सर्व्हिस पिस्तोल मधून हवेमध्ये गोळीबार केला होता .

सदर आरोपीत हा सिने स्टाईल गुंडगिरी करण्यासाठी पुरंदर तालुक्यातील महाविद्यालयात शिकणाऱ्या तरूण मुलांना त्याचे गुन्हेगारी टोळीमध्ये सामील करून घेत होता . त्यासाठी त्याचे टोळीतील सदस्यांनी व त्याने त्यांचे टोळीची पुरंदर तालुक्यात कशी दहशत आहे हे दाखविण्यासाठी फेसबुक सारख्या सामाजिक संकेत स्थळावरून त्यांचे गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे व्हीडीओ / ऑडीओ प्रसिध्द करून बेरोजगार तरूणांना या टोळीकडे आकर्षीत करत आहेत . यातील प्रमुख सदस्यांविरूध्द खुन , खुनाचा प्रयत्न, दरोडा , खंडणी , दंगलीसह हिंसेव्दारे दुखापत असे समाजघातक दहशतीचे गुन्हे त्यांचवर दाखल असल्याने पंचक्रोशितील नागरिक त्यांना घाबरून रहात असल्याचा फायदा घेवून ते त्यांची लुटपाट करीत होते . त्यांचे टोळविरुद्ध गेल्या महिनाभरात वर नमुद गुन्हयासह पुढील प्रमाणे गंभीर गुन्हयांची नोंद झालेली आहे .

१ ) सासवड पोलीस स्टेशन कडील गु . र . नं . ४०२ / १९ भा. द . वि क . ३०७ . ४५२ , ३२४ , १४३ , १४७ , १४८ , १४९
२ ) सासवड पोलीस स्टेशन गु . र नं . ४९८ / १९ भा . द . वि . क . ३८५ . ३८७ , ३४
३ ) राजगड पोलीस स्टेशन कडील गु . र . नं . ३७९ / १९ भा . द . वि . क . ३९५ , ३९७ , ५०४ त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण होवून त्यांना त्यांचे जीवीताची व संपत्तीचे सुरक्षे बाबत भिती निर्माण झाली होती , त्यामुळे त्यांचे टोळीतील गुन्हेगारांना पकडणेसाठी सासवड पोलीस ठाणे , राजगड पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा पुणे ग्रामीण कसोशिने प्रयत्न करीत होते . त्यांचेतील बहुतांश सदस्यांना पोलीसांनी अटक केलेली आहे . परंतू दिगंबर शेंडकर हा प्रमुख आरोपी फरार राहून गंभीर – गंभीर गुन्हे करीत होता . त्याला कशाचीही भिती उरलेली नव्हती . अशा परिस्थीतीत मा . पोलीस अधीक्षक साहेब श्री संदीप पाटील , मा . अपर पोलीस अधीक्षक सो श्री जयंत मिना , मा . उप विभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड श्री अण्णासाहेब जाधव व सासवड पोलीसांचे  पो . नि . डी . एस . हाके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राहुल घुगे , पो . हवा . संदीप चांदगुडे , पो . हवा . भरत आरडे , पो . ना . महेश खरात , पो . ना . राहुल कोल्हे पो कॉ कैलास सरक यांनी सहभाग घेवून आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले आहे . त्यामुळे परीसरातील लोकांनी सुटकेचा  नि:श्वास टाकला असून पोलीसांचे कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/