सासवड पोलिसांनी खड्डे बुजवून घडविले माणुसकीचे दर्शन

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन  – पुरंदर तालुक्यातील सासवड शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून त्यामुळे कऱ्हा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्याने सासवड वरून नारायणपूर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहिले. त्यामुळे पुलावरील रस्ता खुप खराब झाला, पाणी ओसरल्यानंतर त्या पुलावरून वाहतूक सुरू करण्यासाठी बांधकाम विभागाशी पोलिसांनी संपर्क केला व रस्ता दुरुस्तीची मागणी केली. परंतु संबंधित विभागाने याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही त्यामुळे सासवड पोलीस स्टेशन येथील पोलिस कर्मचारी यांनी मिळून रस्त्यावरील खड्डे बुजवून तात्पुरती प्रवाशांची येण्या जाण्याची सोय केली आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला.

प्रवाशांचे होणारे हाल व पूर परिस्थिती तसेच पावसाळी हवामान यामुळे काही प्रमाणात पोलिसांनी केलेल्या श्रमदानामुळे प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे. पोलिसांनी खड्डे बुजवून माणुसकीचे दर्शन घडवले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत राबविलेला उपक्रम अतिशय उत्तम आहे. सदर जीवघेणे खड्डे बुजविण्यात आल्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. इतकेच नव्हे तर अनुचित घटनेला आळाही घालता येईल.

Visit : Policenama.com