Lockdown : सासवड पोलिसांची कारवाई लॉकडाउन मध्ये वसूल केला 13.5 लाखाचा दंड

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील सासवड पोलिसांनी लॉकडाऊन काळात नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून आत्तापर्यंत १३ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर ३८९ लोकांवर १८८ नुसार कारवाई केली, अशी माहिती सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डी. एस. हाके व सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलिस स्टेशनचे वाहतूक विभागाचे पोलिस नाईक ज्योतिबा भोसले व पथकाने १५ मार्च ते १३ जुलै या लॉकडाऊनच्या काळात सासवड पोलिस स्टेशनकडून ५६६६ वाहनांवर कारवाई कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून आत्तापर्यंत १३ लाख ५० हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

लॉकडाऊनचे उल्लंघन करून विनाकारण फिरणारे, विनामास्क फिरणाऱ्या लोकांच्या विरोधात भादंवि कलम १८८ अन्वये ३८९ गुन्हे दाखल केले आहे. तसेच दारूबंदी संदर्भात ३५ गुन्हे व झुगारप्रकरणी २ गुन्हे दाखल केले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ प्रमाणे अद्यापपर्यंत १६ जणांना हद्दपार करण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी सासवड पोलिस स्टेशनचे स.पो. फौ. रविंद्र काळभोर, पो. हवा. माने, एस. आर. चिखले, बाळासाहेब गोडसे, कोकरे, पो.ना. अजित माने, एम. एम.खरात, कोल्हे, पो. शिपाई कैलास सरक, प्रतीक धिवार, निलेश जाधव, दत्ता जाधव, होमगार्ड, ग्रामरक्षक दलाची सदस्य यांनी केली आहे