Coronavirus : सातार्‍यात सोमवारी कोरोनाचे 15 बळी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस करोनाबाधीतांच्या मृत्युचा आकडा वाढत आहे. त्यात सोमवारी आणखी 15 जणांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनाने मृत्यू पावलेल्यांची संख्या 397 वर पोहोचलेली आहे. त्याचबरोबर रविवारी रात्री 489 जणांना करोना झाल्याचे निष्पन्न झालेले आहे.

सातारा जिल्ह्यात सोमवारी 15 जणांचा मृत्युने करोनाने झाला आहे. त्यामध्ये राजापुरी (ता. खटाव), 30 वर्षीय महिला, कडगाव (ता.पाटण) 79 वर्षीय महिला, दुर्गापेठ (सातारा) 70 वर्षीय पुरुष, गुरुवारपेठ (सातारा) 67 वर्षीय पुरुष, कवडेवाडी (ता. कोरेगाव) 75 वर्षीय पुरुष, जावळे (ता. फलटण) 58 वर्षीय महिला यांचा करोनाने मृत्यू झालेला आहे.

त्याचबरोबर शनिवार पेठ (ता. कराड) 57 वर्षीय महिला, म्हसवड (ता. माण) 58 वर्षीय पुरुष, भाटी (ता. माण) 55 वर्षीय महिला, पुसेसावळी (ता. खटाव) 58 वर्षीय पुरुष, पुसेगाव (ता. खटाव) 79 वर्षीय पुरुष, शिरवळ (ता.खंडाळा) 64 वर्षीय पुरुष, पापर्डे (ता. पाटण) 52 वर्षीय पुरुष, गोळेश्वर (कराड) 55 वर्षीय पुरुष, पाटण 76 वर्षीय महिला यांचाही करोनाने मृत्यू पावलेल्यांमध्ये समावेश आहे.