खुशखबर ! आता 70 रूपयांचा LED बल्ब मिळणार फक्त 10 रूपयांना, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना यापुढे विजेचा ब्लब खरेदी करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. भारतातील एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (EESL) ही कंपनी ग्रामीण भागातील सहाशे कोटी एलईडी बल्ब प्रत्येक तुकडीसाठी दहा रुपये दराने देण्याची योजना आखत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. जगातील सर्वात मोठी विद्युत प्रणाली ईईएसएल चालवत आहे. त्यानुसार 2014 मध्ये 310 रुपयांना सरकारच्या उजाला योजनेंतर्गत विकलेला एलईडी बल्ब आता 70 विकला जातो. परंतु, ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांना हा बल्ब केवळ दहा रुपयात मिळणार असून कार्बन क्रेडिटमधून मिळणाऱ्या रिव्हेन्यूद्वारे उर्वरित साठ रुपये दिले जाणार आहेत.

कार्बन क्रेडिट्सचा क्लेम करण्याचा फायदा उजाला योजनेंतर्गत दिला जातो. ही योजना सरकार व संयुक्त राष्ट्रांच्या स्वच्छ विकास यंत्रणेअंतर्गत चालते. या योजनेसाठी चार हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. या योजनेंतर्गत एक कोटी एलईडी बल्ब देण्यात येणार आहेत. यामध्ये सहाशे कोटी ग्राहकांकडून तर उर्वरीत रक्कम या रेव्हेन्यूतून मिळणार आहे. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे, असे ईईएसएल समूहाचे कार्यकारी उपाध्यक्ष सौरभ कुमार यांनी एका प्रसार माध्यमांच्या मुलाखतीत सांगितले.

सौरभ कुमार यांनी यावेळी सांगितले की, ग्रामीण भागातील ग्राहकांना 70 रुपयांना एलईडी बल्ब घेणे परवडत नाही. त्यामुळे या योजनेअंतर्गत आम्ही ग्राहकांचे जीवन प्रकाशमान करणार आहोत, तसेच हा एलईडी बल्ब दहा रुपयांना देणार आहोत. दरम्यान, उजाला योजनेंतर्गत 360 कोटी एलईडी बल्बपैकी केवळ 18 टक्के बल्बचे ग्रामीण भागात वितरण झाले आहे. ग्राम उजाला योजना ग्रामीण भागातील ऊर्जा प्रवेश सुधारण्यास मदत करणार आहे.

एलईडी बल्ब निविदा काढण्याच्या अनिवार्य देशांतर्गत कलमामुळे जागतिक पुरवठा साखळींचा अविभाज्य भाग बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांनाही वेग आला आहे. कारण कंपन्या चीनच्या बाहेर उत्पादन रेषेत हलविण्याचा विचार करत आहे. वुहानमध्ये उद्भवलेल्या कोरोना साथीचा रोग संपूर्ण देशात वेगाने पसरला आहे. त्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे सौरभ कुमार यांनी म्हटले आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात दहा कोटी एलईडी बल्ब देण्यात येणार आहेत. तसेच जेव्हा ही योजना सीडीएमच्या अंतर्गत नोंदणीकृत होईल, तेव्हा आम्ही ग्राम उजाला सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना होणार असून त्यांची आर्थिक बचत देखील होणार आहे. अनेक राज्यातील गावांमध्ये अद्याप विज पोहचली नाही. त्यांनाही आता नवी ऊर्जा मिळणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा होणे बाकी असले तरी ही योजना ग्रामीण भागासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.