सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – Satara Accident | राज्यात दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच एक अपघाताची घटना साताऱ्याच्या खंबाटकी बोगद्यात (Khambataki Tunnel, Satara) घडली आहे. या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका दीड वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. (Satara Accident)
काय आहे नेमके प्रकरण?
पुण्यातील सराफ कुटुंबीयांच्या गाडीचा अपघात झाला आहे. कार चालकाला झोप लागल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात (Accident News) झाला. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. हे कुटुंब गोकर्ण महाबळेश्वरकडुन ट्रीप संपवुन पुण्याला जात होते. यादरम्यान हा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शिरवळच्या जोगळेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Web Title :- Satara Accident | driver loose the control from the vehicle two died in major car accident in satara
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- CM Eknath Shinde | भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Chitra Wagh | चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटलांची तुलना महात्मा फुलेंसोबत, म्हणाल्या-‘घरोघरी सावित्री दिसतात, मात्र, चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या…’
- Neha Dhupia | 20 वर्षांपूर्वी नेहा धुपियाने ‘या’ अभिनेत्याबाबत केलेली भविष्यवाणी होतीय खरी; ट्विट शेअर करत दिली माहिती