Satara Accident News | महाबळेश्वरमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – Satara Accident News | शुक्रवारी सकाळी सिन्नर -शिर्डी मार्गावर पाथरे परिसरात ट्रक आणि बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला होता. हि घटना ताजी असताना साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये असाच अपघात झाला आहे. यामध्ये मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो दरीत कोसळला आहे. मुकदेव येथील कोठरोशी पुलाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कधी घडला अपघात?

या अपघाताबाबत सविस्तर माहिती अशी कि, महाबळेश्वरजवळ मुकदेव येथील कोठरोशी पुल परिसरात टेम्पो दरीत कोसळून भीषण अपघात झाला. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास झाला. यावेळी या टेम्पोमधून तीस मजूर प्रवास करत होते. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. (Satara Accident News)

बचावकार्याला सुरुवात

या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला सुरुवात केली.
या अपघातातील जखमी मजुरांना दरीतून बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Web Title :-Satara Accident News | terrible accident in mahabaleshwar tempo falls into valley

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bombay High Court | मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी आनंद परांजपेंना हायकोर्टाचा दिलासा, पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

Chandrashekhar Bawankule | ‘…त्यामुळेच ते दुसऱ्यांवर टीका करतात’; चंद्रशेखर बावनकुळेंची काँग्रेसवर टीका