सातारा येथे डोळ्यात मिरचीपूड टाकून डोक्यात बॅटने वार

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन

सातारा तेथे क्षुल्लक कारणावरून डोळ्यात मिरचीपूड टाकून बॅट ने डोक्यात वार केल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, वर्णे येथील काळभैरव मंडळाच्या मुलांनी आरडाओरडा का केला? असे विचारल्यामुळे गणेश शिवाजी गायकवाड (मूळ रा.कटगूण ता.खटाव सध्या रा.वर्णे ता.सातारा) याने चिडून इंद्रजीत माणिक पवार (वय 25, रा.वर्णे) याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून बॅटने डोक्यावर वार केला. घटनेनंतर जखमी इंद्रजीत याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून बोरगाव पोलिस ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला आहे.