सातार्‍याच्या पोटनिवडणूकीत उदयनराजेंच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण मैदानात !

सातारा : पोलिसनामा ऑनलाईन – सातारा जिल्ह्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी काल रात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज सकाळी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्रातील मोठे नेते उपस्थित होते. त्यामुळे आता उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आता या ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उदयनराजे भोसले यांच्याविरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता या ठिकाणी उदयनराजे भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून याठिकाणी चव्हाण हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्यास काँग्रेसला हा मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार असल्याची माहिती देखील मिळत आहे. त्यामुळे आता काँग्रेस पुन्हा साताऱ्याला आपला बालेकिल्ला बनविण्याचा प्रयत्न करताना दिसून येणार आहे. यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसून सध्या राजकीय वर्तुळात केवळ अशी चर्चा सुरु आहे.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता या ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे हि पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकांच्या बरोबरच होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता या ठिकाणी कधी निवडणूक जाहीर होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण हे उदयनराजेंविरूध्द पोटनिवडणूकीत मैदानात उतरणार असल्याचे वृत्‍त वार्‍यासारखे पसरल्यानंतर यावर चव्हाण यांनी खुलासा केला आहे. चव्हाण म्हणाले की, हे वृत्‍त चुकीचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

You might also like