सातारा : कार दरी कोसळून तिघांचा जागीच मृत्यु; 5 जण जखमी

सातारा : सातार्‍यातील जावळी तालुक्यामधील मेरुलिंग घाटात कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३ जण ठार झाले असून ५ जण जखमी झाले आहेत. घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने ही गाडी थेट दरीत कोसळली. या अपघातात गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

रेशनिंग आणण्यासाठी जात असताना मेरुलिंग घाटातील एका वळणाचा अंदाज न आल्याने गाडी उलटून दरीत कोसळली. अपघातात जखमी झालेल्या ५ जणांना मेढा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.