Satara Co-operative Bank Election | खा. उदयनराजें पुन्हा एकदा निवडणुक रिंगणात; राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण?

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara Co-operative Bank Election | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या (Satara Co-operative Bank Election) रिंगणात आता भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosale) हे उतरले आहेत. यामुळे यंदा गृहनिर्माण, दूध उत्पादक संस्था आदी मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, विशेष म्हणजे उदयनराजे यांच्याविरोधात अजुन तरी कोणीही इच्छुक दिसुन आलं नाही. त्यामुळे यंदा उदयनराजे भोसले यांना या मतदारसंघातुन बिनविरोध निवडीची संधी निर्माण झालीय. मात्र, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर (Ramraje Naik- Nimbalkar) आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) हे उदयनराजे विरोधात दुसरा उमेदवार देणार का? हे बघावं लागणार आहे.

गृहनिर्माण, दूध उत्पादक संस्था हा मतदारसंघ एक चर्चेचा विषय आहे. या मतदारसंघातून अधिक वेळा अशोक पाटील-शिरगावकर हे निवडुन आले आहेत. तर या मतदार संघात एकूण 272 ठराव आहे. अधिक ठराव हा सातारा आणि कराड तालुक्यात आहेत. या मतदारसंघात अनेक नेत्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. यात रघुनाथराव पाटील, शंकरराव संसुद्दी, हणमंतराव साळुंखे, जयवंतराव चव्हाण, अशोकराव पाटील-शिरगावकर यांचा समावेश आहे. त्यांच्यानंतर अलीकडच्या काळात खा. उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosale) हे या मतदारसंघातून निवडून आले आहे. तसेच 2 पंचवार्षिक निवडणुकीत उदयनराजेच संचालक झाले आहेत.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांचा त्यावेळी उदयनराजेंनी पराभव केला होता. दरम्यान, यंदाही सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उदयनराजे उतरणार आहेत. मात्र, या वेळेची निवडणूक सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. दरम्यान, मागील निवडणुकीमध्ये पराभव पहाता पालकमंत्री पाटील हे उदयनराजेंच्या विरोधात उमेदवार देण्याची शक्यता आहे. यामुळे आता काय रणनीती आखली जाते हे पाहणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा

Jalna Crime | पावसामुळे ओला दुष्काळ ! मराठा आरक्षण नसल्याने नोकरी नाही, हवालदिल तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Udayanraje Bhonsle | खा. उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेच्या ‘या’ दिग्गज नेत्याची घेतली भेट, राजकीय चर्चेला उधाण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Satara Co-operative Bank Election | satara bank election 2021 role of ncp against mp udayanraje bhosale is important

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update