Coronavirus : सातार्‍यात ‘कोरोना’चा पहिला बळी, 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

सातारा :  पोलीसनामा ऑनलाइन  –  राज्यात कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ७८१ झाली असताना साताऱ्यात कोरोना संसर्गित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्निया वरून आलेल्या ६३ वर्षीय पुरुष रुग्णाचा आज पहाटे मृत्यू झाला. १४ दिवसांपूर्वी या व्यक्तीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

कॅलिफोर्निया वरून साताऱ्यात आलेल्या या रुग्णाचे १४ व्या दिवशी कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. मात्र, त्यानंतरही या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, या व्यक्तीचा मृत्यू नेमका कोरोनाने झाला का अन्य कोणत्या कारणा मुळे याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत अशी घोषणा करण्यात आली नाही.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्ववभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. यात राज्याचा सद्य स्थितीचा आढावा घेतला जाणार असून, कोरोना व्हायरस प्रतिबंध करण्यासंदर्भात राज्यात वरिष्ठ अधिकारी वर्गाची गठीत करण्यात आलेल्या समितीसोबत आरोग्यमंत्री सल्लामसलत करणार आहे.

सातारा जिल्हा (कोव्हिड १९) रुग्णांची आकडेवारी (दिनांक ५.४.२०२० रोजीची सायं- ५ वाजताची )

१.  एकूण दाखल – १८३

२.  जिल्हा शासकीय रुग्णालय – ८६

३.  कृष्णा हॉस्पिटल, कराड – ९५

४.  खाजगी हॉस्पिटल – २

५.  कोरोना नमुने घेतलेले – १८५

६.  कोरोना संसर्गित अहवाल – ४

७. कोरोना अबाधित अहवाल – १६८

८. प्रलंबित अहवाल – ११

९. डिस्चार्ज दिलेले – १६८

१०.  सद्यस्थितीत दाखल – १५

११. आलेली प्रवाशी संख्या (दिनांक ३.४.२०२०) – ६४९

१२.  होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती – ६४९

१३.  होम क्वारान्टीन पैकी १४ दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती – ४९१

१४.  होम क्वारान्टीन पैकी १४ दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती – १५८

१५.  संस्थेमध्ये अलगीकरण केलेले – ६०

१६.  आज दाखल – २

१७.  यापैकी डिस्चार्ज केलेले – ३०

१८.  यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात – ०

१९.  अद्याप दाखल – ३०