Satara Crime | दुर्देवी ! अंघोळ करताना शाॅक लागल्याने 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara Crime | एका 12 वर्षाच्या शाळकरी मुलाचा बाथरुममध्ये अंघोळ करत असताना विजेचा शॉक (Electric Shock) लागून मृत्यू (Died) झाल्याची दुर्देवी घटना (Satara Crime) घडली आहे. ही घटना औंध (Aundh) येथील करांडेवाडी नजीकच्या यादव मळ्यात घडली. पियुष सुनिल यादव (Piyush Sunil Yadav) असं त्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत माहिती अशी की, औंध येथील करांडेवाडी रस्त्याला असलेल्या यादव मळ्यात रहात असलेल्या सुनील सावता यादव (Sunil Sawta Yadav) यांचा मुलगा पियुष यादव हा राहत्या घरात सकाळी अंघोळ करण्यासाठी बाथरुममध्ये गेला होता. बाथरूममधील वायरचा शॉक लागल्याने पियुषला विजेचा जोरदार धक्का लागला. त्याला कुटुंबियांनी तत्काळ औंध ग्रामीण रुग्णालय (Aundh Rural Hospital) येथे उपचारासाठी दाखल केले. पण उपचारापूर्वी त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. (Satara Crime)

दरम्यान, याबाबत सुनील यादव यांनी औंध पोलिस ठाण्यात (Aundh Police Station) तक्रार दिली. वरील घटनेची नोंद औंध पोलिस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील (Police Constable Chandrakant Patil) करीत आहेत.

Web Title  : Satara Crime | Bad luck ! A 12-year-old schoolboy dies of shock while taking a bath satara crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त