Satara Crime | दुर्दैवी ! दीड वर्षानंतर गावच्या यात्रेला आले अन् .. भीषण अपघातात दोन सख्खे चुलत भाऊ ठार

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara Crime | सातारा जिल्ह्यातील गोंदवले खुर्द (Gondwale Khurd) येथे मंगळवारी दोन दुचाकी आणि स्विफ्ट कारचा (Swift Car) भीषण अपघात (Terrible Accident) झाला. हा अपघात इतका भयानक होता की, अपघातानंतर पल्सर (Pulsar) कंपनीच्या दुचाकीने पेट घेतला. कार 30 फूट लांब रानात जाऊन पलटी झाली. या अपघातात दोन सख्ख्या चुलत भावांचा (Cousins) मृत्यू (Death) झाला तर एक जण गंभीर जखमी (Satara Crime) आहे.

 

अजित शंकर नरळे Ajit Shankar Narale (वय 18) व त्याचा चुलत भाऊ उमाजी आप्पा नरळे Umaji Appa Narale (वय 22, दोघे रा. पानवण ता. माण), अशी अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. तर नामदेव नागु वीरकर Namdev Nagu Veerkar (वय 45 रा. जांभुळणी ता. माण) हे गंभीर जखमी (Seriously Injured) झाले आहेत.(Satara Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी सकाळी उमाजी आणि अजित हे दोघे पुण्यातून (Pune) पल्सर (नंबर माहीत नाही) तर दुसरी दुचाकी (एम एच 11 सीके 8043) तर एक स्विफ्ट कार (क्र. एम एच 14 जी एच 4458) ही कार दिघंची आटपाडी (Dighachi Atpadi) येथील महेंद्र ज्ञानू वाघमारे (Mahendra Gyanu Waghmare) हे आपला मुलगा आशिष सोबत पुण्याला निघाले होते.
गोंदवले येथे मुख्य रस्त्यावर मेजर हॉटेल समोर दुचाकी आणि स्विफ्टचा भीषण अपघात झाला.

कारच्या धडकेने पल्सरने पेट घेतला तर कार 30 फूट लांब एका शेतात जाऊन पलटी झाली.
पल्सर वरील उमाजी नरळे हा जागीच ठार झाला.
तर त्याचा चुलत भाऊ अजित नरळे याचा कराडला उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. दरम्यान नामदेव वीरकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सातारा येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
अपघाताची माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाण्यातील (Dahiwadi Police Station) वाहतुक पोलीस केतन बर्गे (Traffic Police Ketan Barge), गजानन वाघमारे (Gajanan Waghmare) व राऊत (Raut) यांनी तात्काळ रोड वरील गर्दी हटवून रस्ता खुला केला.
या अपघाताची दहिवडी पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर (API Santosh Tasgaonkar) करत आहेत.

 

अजित नरळे हा आई वडिलांचा एकुलता एक आहे तर उमाजीला एक भाऊ आणि चार बहिणी आहेत.
दोघांची घरची परिस्थिती हलाखीची असून आई – वडील ऊसतोड मजूर म्हणून काम करतात.
नुकतेच ते काम संपवून ते घरी आले होते तर कुटूंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून अजित पुण्यातील एका कंपनीत कामाला होता.
तर गेल्या दीड वर्षांपासून उमाजी हा नेपाळमधील एक सोन्या चांदीच्या दुकानात काम करत होता.
गावची यात्रा असल्याने तो दीड वर्षानंतर गावी येत होता परंतु तत्पूर्वीच ही दुर्घटना घडली.
यामुळे पानवण गावावर शोककळा पसरली आहे.

 

Web Title :- Satara Crime | Car Bike Accident Two Brothers Died In Satara District

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा