Satara Crime | मुंबई पोलिसांना गुंगारा देणारा म्हाडाचा तोतया अधिकारी सातारा पोलिसांच्या ताब्यात

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara Crime | म्हाडाच्या तोतया अधिकाऱ्याला सातारा शहर पोलीसांनी (Satara City Police) ताब्यात घेतले आहे. मुंबई येथे म्हाडा प्रकल्पांमध्ये अधिकारी असल्याचे सांगत आणि नागरीकांना फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून तब्बल 99 लाख 84 हजारांची फसवणूक (Fraud) करून पसार झालेल्या म्हाडाच्या तोतया अधिकाऱ्याला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरणच्या (Crime Disclosure) कर्मचाऱ्यांकडून अटक (Arrested) करण्यात आले आहे. अरूण गणपत शिंदे (Arun Ganpat Shinde) (वय 52, रा. माणगाव, जि. रायगड, सध्या रा. मिरारोड मुंबई) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Satara Crime)

याबाबत माहिती अशी की, मुंबई येथे म्हाडा प्रकल्पांतर्गत प्लॅट देण्याचे सांगून 99 लाख 84 हजारांची फसवणूक करून मागील 3 वर्षांपासून अरुण शिंदे हा फरार होता. अरूण शिंदे याच्यावर मुंबई येथील मिरारोड आणि जोगेश्वरी पोलीस ठाण्यात (Jogeshwari Police Station) गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या फसवणुकीचे आणि चेक बाउन्सचे गुन्हे देखील त्याच्यावर दाखल आहेत. दरम्यान, अरूण शिंदे हा सातारा शहरात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर (Police Inspector Bhagwan Nimbalkar) यांना समजली. (Satara Crime)

त्या माहितीनूसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाला तात्काळ त्याला पकडण्याच्या सूचना दिल्या. अरूण शिंदे हा गोडोली परिसरामध्ये आला असता त्याला पोलिसांनी सापळा रचुन ताब्यात घेतले. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) 3 वर्षांपासून गुंगारा देणारा अरुण शिंदेला पकडल्यानंतर मिरारोड पोलिसांना (Mira Road Police) याची माहिती देण्यात आली आहे. त्याला नेण्यासाठी मुंबईहून एक पथक साताऱ्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, सदरची कारवाई पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर (Police Inspector Bhagwan Nimbalkar), पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर (Police Inspector Vandana Sri Sundar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर कदम (PSI Sameer Kadam),
पोलीस नाईक सुजित भोसले (Police Naik Sujit Bhosale), अविनाश चव्हाण (Avinash Chavan), ज्योतीराम पवार (Jyotiram Pawar),
अभय साबळे (Abhay Sable), गणेश घाडगे (Ganesh Ghadge), संतोष कचरे (Santosh Kachare) यांनी केली आहे.

Web Title : Satara Crime | mhadas imposter officer caught in satara City Police Arun Ganpat Shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्चPune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्याSupreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात