Satara Crime | मेहुण्यानेच केला भावोजीचा खून? सातारा जिल्ह्यात खळबळ

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara Crime | मेहुण्याने भावोजीचे अपहरण करून खून केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील फलटणमधील जिंती गावात (Kidnapping and murder case in Satara Crime) घडली आहे. चिखलात पालथा पडलेला मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात करून संशयावरून मेहुण्याला ताब्यात घेतले. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव शकील अकबर शेख (21) (Shakeel Akbar Sheikh) असून पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलेल्या मेहुण्याचे नाव मोन्या निंभोरे (रा. साखरवाडी, ता. फलटण) (Monya Nimbhore) आहे.

मोन्या निंभोरे याच्या बहिणने दीड वर्षापूर्वी अंतरधर्मीय लग्न केले होते. याच रागातूनच ही घटना घडल्याच्या संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, यापूर्वी सुद्धा 28 डिसेंबर 2019 रोजी मोन्याने शकीलवर तलवारीने हल्ला केला होता. पण, यातून शकील बचावला होता. मोन्या गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्यावर ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

शकील शेखने साधारण दीड वर्षांपूर्वी मोन्या निंभोरे याच्या बहिणीसोबत प्रेमविवाह केला होता. ते दोघे जिंती येथील विकासनगर (Jinti, Vikasnagar) मध्ये रहात होते. लग्नानंतर शकीलने त्याच्या पत्नीचे नाव खुशी (Khushi) ठेवले होते.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, सोमवारी (16 ऑगस्ट) दुपारी शकील आणि त्याचा मित्र विकास रघुनाथ आवटे हे दोघे दुचाकीवरून कपडे आणण्यासाठी रणवरे वस्ती येथे गेले होते. तेथून परतत असताना रात्री 9 च्या सुमारास शकीलच्या दुचाकीला गाडी आडवी घालून 4 ते 5 जणांनी शकील याचे अपहरण केले.

शकील उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेऊन अखेर पत्नी खुशी (22) ने त्याचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली.
यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता होळ, ता. फलटण येथे शकीलचा मृतदेह चिखलात पालथा पडलेला आढळून आला.
यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे (Sub-Divisional Police Officer Tanaji Barde) व पो.नि. नितीन सावंत (P.I. Nitin Sawant) यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

चिखलात तोंड दाबून शकिलचा खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान मृतदेह शवविच्छेदनाठी पाठवण्यात आला आहे.
बहिणीने अंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून हा खून केला असावा,
या संशयातून पोलिसांनी मोन्या निंभोरे यास ताब्यात घेतले आहे.
या घटनेने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Web Title :- Satara Crime | murder of 21 year old youth in satara

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Credit Card Market | एचडीएफसी बँकेवरील बॅनमुळे ICICI बँकेचा झाला फायदा, 13.63 टक्के राहिली ग्रोथ

Cotton Global Market Prices | शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी! जागतिक बाजारात 7 वर्षाच्या उच्चस्तरावर पोहचले कापसाचे दर

Pune Corporation | निवडणुक निधी गोळा करण्यासाठी भाजपने Amenity Space च्या माध्यमातून पुणेकरांची ‘संपत्ती’ विकण्याचा डाव आखला; राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप