Satara Crime | नवरा-बायकोच्या भांडणामध्ये पतीनं स्वतःचं घर ‘फूकलं’, आजूबाजुच्या 10 घरांना लागली आग; 50 लाखाचं नुकसान (व्हिडीओ)

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा (Satara Crime) जिल्ह्यातील चाफळ (chaphal) येथे पती-पत्नीत झालेल्या घरगुती भांडणातून पतीने स्वतःच्याच घराला आग (Fire) लावली. मात्र शेजारी असणाऱ्या ९ घरांनीही पेट घेतला. सोमवारी सायंकाळी हि घटना घडली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने दहा कुटुंबांच्या घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य, धान्य, दाग-दागिने, रोखड, शेतीची औजारे आदी आगीत जळून खाक झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, अग्निशमन दल आणि ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन तासात हि आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये ५० लाखाहून अधिक रुपयनाचे नुकसान झाले (Satara Crime) आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी दिवसभर संजय रामचंद्र पाटील आणि त्यांची पत्नी पालवी यांच्यात वाद सुरु होता.
सायंकाळच्या सुमारास हा वाद इतका टोकाला गेला की, संजय यांनी चिडून जाऊन स्वत:च्या राहत्या घरात आग लावली.
आगीमुळे घरातील गॅस सिलेंडरने पेट घेतला. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण (Satara Crime) केले.
ही आग इतकी भयंकर होती कि बाजूला असणाऱ्या पांडुरंग महादेव पाटील, ज्ञानदेव महादेव पाटील, संभाजी गणपत पाटील, चंद्रकांत शिवाजी पाटील, भीमराव गणपती पाटील,
दातत्रय मारुती पाटील, कृष्णात मारुती पाटील, पंढरीनाथ मारुती पाटील, गोरखनाथ मारुती पाटील व भाडेकरू आनंदराव तुकाराम पाटील या दहा घरांनादेखील आग (Satara Crime) लागली.
ग्रामस्थांनी तत्काळ पाटण तालुका खरेदी विक्री संघ, सह्याद्री साखर कारखाना व जयवंत शुगरच्या अग्नि शामक या तीन गाड्यांना पाचारण केले.
मात्र गाड्या येण्यास वेळ होता. दरम्यान, सर्व संसार उपयोगी साहित्य, टीव्ही, फ्रिज, दागिने, रोखड व इतर मौल्यवान साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.
आग आटोक्यात आणण्यासाठी माजगाव ग्रामपंचायतीने सर्व घरातील नळास मुबलक पाणी सोडून गावातील तरुणांनी प्रथम आग आटोक्यात आणण्याचा खूप प्रयत्न केला.
लोकांनीही मिळेल, त्या पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर काही अंतरच्या फरकाने या सर्व गाड्या घटना स्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या दोन तासांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.
या आगीत सुमारे ५० लाखाच्यावर नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच मल्हारपेठ पोलीस स्टेशनचे (malhar peth police station, Patan) सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर (API Uttam Bhapkar),
चाफळ पोलीस दूर क्षेत्राचे सिद्धांत शेडगे, होमगार्ड यांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी सहकार्य केले.
Web Title : Satara Crime | near about ten houses set on fire in chaphal due to quarrel between husband and wife in satara district
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Bill Gates | बिल गेट्स यांनी महिला कर्मचार्याला ‘डेट’वर येण्यासाठी पाठवला होता मेल