Satara Crime News | भावाने फसवणूक केल्यामुळे तरूणाने व्हॉटस्अप स्टेटस ठेवत उचलले ‘हे’ पाऊल

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – Satara Crime News | आपल्या हातात पैसा आला कि आपण सगळं काही विसरतो अगदी रक्ताची नातीसुद्धा विसरतो. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये घडली आहे. सैन्य दलात भरती करण्याच्या अमिषाने फसवणूक (Fraud) झाल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. कराड तालुक्यातील कोळे या गावामध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे. दयानंद बाबुराव काळे (Dayanand Baburao Kale) असे आत्महत्या (Suicide) करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने आपल्या मोबाईलमधील व्हाट्सअपवर स्टेटस ठेवत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात (Karad Rural Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. सैन्य दलात जवान असलेला त्याचा चुलत भाऊ प्रदीप विठ्ठल काळे (Pradeep Vitthal Kale) याला या प्रकरणी अटक (Arrest) करण्यात आली आहे. (Satara Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?
मृत दयानंद याचा चुलत भाऊ प्रदीप काळे हा सैन्य दलात कार्यरत आहे. प्रदीप प्रमाने दयानंदही भरतीसाठी प्रयत्न करत होता. या दरम्यान प्रदीपने मला फोन करून दयानंदला सैन्य दलात भरती करतो, असे सांगितले. फक्त दीड लाख रुपये द्या. पंधरा दिवसात सैन्य दलात भरती झाल्याचे नियुक्तीपत्र येईल, असे सांगून त्याने पैशांची मागणी केली. यानंतर त्याला वेळोवेळी रोख तसेच ऑनलाईन 9 लाख रूपये दिले असल्याचे दयानंदचा भाऊ शिवानंद बाबुराव काळे (Shivanand Baburao Kale) यांनी सांगितले. त्याने या प्रकरणी प्रदीप विरोधात फिर्याद दाखल केली आहे. (Satara Crime News)

मागच्या काही महिन्यांपासून प्रदीप दयानंदला शब्द देत होता. पावसाळा संपला की तुला ट्रेनिंगला बोलवतील, असे तो वारंवार सांगायचा. काही दिवसानंतर प्रदीप हा घराच्या वास्तुशांतीसाठी सुट्टीवर गावी आला होता. त्यावेळी शिवानंद व त्याच्या वडिलांनी प्रदीपला दयानंदच्या भरतीबाबत विचारणा केली असता थोडे दिवस थांबा माझे वरिष्ठांशी बोलणे झाले आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेत होता. यानंतर भरतीला विलंब होत असल्याचे पाहून दयानंदने प्रदीपला फोन करून ट्रेनिंगला कधी जायचे आहे ते सांग नाहीतर मला माझे पैसे परत दे, असा इशारा दिला. यानंतर दयानंदच्या कुटुंबीयांनी प्रदीपकडे पैसे परत देण्याचा तगादा लावला.

यानंतर दयानंदने प्रदीपला फोन केला असता तू मला दिलेल्या शिव्या ऐकून आमच्या अधिकार्‍यांनी तुझी फाईल फाडली, असे प्रदीपने सांगितले. तसेच 2 लाख 90 हजार रुपयांचा चेक दिला.
नंतर नोकरी आणि उर्वरीत पैशाबाबत प्रदीप टाळाटाळ करू लागला.
त्यामुळे दयानंद आपली फसवणूक झाल्यामुळे तणावात गेला.
यानंतर कुटुंबीयांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
अखेर दयानंदने शिवारातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
यानंतर कुटुंबीयांनी त्याचा मोबाईल पाहिला असता प्रदीप काळे याने भरती करतो म्हणून घरच्यांकडून नऊ लाख
रुपये घेऊन मला फसविले आहे. याबाबतचा पुरावा माझ्या फोनमध्ये आहे.
तसेच प्रदीपने गावातील काही मुलांना देखील असेच अमिष दाखवून फसवले आहे असे व्हॉटस्अप स्टेटस
ठेवत आत्महत्या केली. पोलिसांनी या आत्महत्येप्रकरणी प्रदीप काळे याला ताब्यात घेतले आहे.

Web Title :-  Satara Crime News | boy took an extreme step by keeping a whatsapp status of being cheated by his brother

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Crime News | नाशिकमध्ये भर रस्त्यात तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी (व्हिडिओ)

Kolhapur News | ट्रक उलटला अन ग्रामस्थांची गर्दी झाली; ‘मदती’ला नव्हे ‘लुटालुटी’ला

Nagpur Crime News | नागपूरमध्ये तलवार गॅंगची दहशत; भर बाजारात केली तोडफोड