Satara News : जादा व्याजाच्या आमिषाने महिलेची फसवणूक, फलटण आणि पुण्यातील तिघांवर FIR

लोणंद/सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  मार्केटिंग कंपनीत पैसे गुंतवल्यावर पैशाला जादा व्याज व पैसे दामदुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सीमा सुनील धनावडे यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी फलटण, पुणे येथील तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सीमा धनावडे यांनी लोणंद येथील रयल वेज मार्केटिंग बिझनेस प्रा. लिमिटेड या मार्केटिंग कंपनीमध्ये टप्प्याटप्प्याने 2 लाख 70 हजार भरले. त्यापैकी कंपनीने केवळ 26 हजार रुपये त्यांना परत केले. उर्वरीत 2 लाख 44 हजार रुपयांची मागणी केली असता रयल वेज कंपनीकडून टाळाटाळ करण्यात आली. अशी फिर्याद धनावडे यांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रयल वेज कंपनीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

लोणंद पोलिसांनी रयल वेज मार्केटिंग बिझनेस प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष विठ्ठल अंकुश कोळपे, अनिल अंकुश कोळपे (रा. कुसूर, ता. फलटण) व उपाध्यक्ष संदीप सोपान येळे (रा. पारोडी, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी करीत आहेत.