Satara Crime News | पाटण तालुक्यात लग्नाच्या मिरवणुकीत गोळीबार

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – Satara Crime News | पाटण तालुक्यात पुन्हा एकदा गोळीबाराची (Firing) घटना उघडकीस आली आहे. यामध्ये तळमावले या ठिकाणी एका व्यक्तीने उत्साहाच्या भरात लग्नाच्या मिरवणुकीत बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडल्या आहेत. या घटनेमुळे मिरवणुकीत एकच गोंधळ उडाला. जितेंद्र जगन्नाथ कोळेकर Jitendra Jagannath Kolekar (वय 51, रा. तळमावले) असे मिरवणुकीत गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला ढेबेवाडी पोलिसांनी (Dhebewadi Police) हवेत गोळीबार केल्याप्रकरणी अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडून परवानाधारक 12 बोअरची रायफल आणि दहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
पाटण तालुक्यातील तळमावले या ठिकाणी काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाच्या (Kakasaheb Chavan College) गेटसमोर एका लग्नाची मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीदरम्यान एका व्यक्तीने बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडल्या. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पाटणचे डीवायएसपी विवेक लावंड (Vivek Lawand, DYSP of Patan) यांच्यासह ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी (Abhijit Chaudhary, Assistant Police Inspector, Dhebewadi Police Station) यांनी घटनास्थळी धाव घेऊन गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. जितेंद्र जगन्नाथ कोळेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक चौधरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सातारा जिह्यात आठवडय़ात तिसऱयांदा फायरिंग
पाटण तालुक्यात रविवारी 19 मार्च रोजी मुख्यमंत्री शिंदे यांचा माणूस व माजी नगरसेवक मदन कदम
(Former corporator Madan Kadam) याने केलेल्या गोळीबारात 2 ठार, तर एकजण गंभीर जखमी झाले होते. हि घटना ताजी असताना तीन दिवसांनी म्हणजे 22 मार्च रोजी सातारा तालुक्यात एका मॉलमध्ये बंदुकीतून
गोळी सुटून एक सेल्समन जखमी झाला होता. त्यानंतर आता थेट लग्नाच्या मिरवणुकीत बंदुकीतून फैरी झाडल्यामुळे
सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एकाच आठड्यात 3 वेगवेगळ्या गोळीबाराच्या घटना घडल्याने सातारा
जिल्ह्यात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Web Title :-  Satara Crime News | firing in a marriage ceremony in patan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parbhani News | परभणीचे खासदार संजय जाधव यांना दुसऱ्यांदा जिवे मारण्याची धमकी; राजकीय क्षेत्रात उडाली खळबळ

BJP MLA Nitesh Rane | राहुल गांधीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन पाकिस्तानात हकलून द्या, आमदार नितेश राणेंचा घणाघात