Satara Crime News | येणपेमध्ये रिक्षा व ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कराड : पोलीसनामा ऑनलाईन – Satara Crime News | कराड ते कोथरूड या महार्गावरील येणपे गावाच्या हद्दीत रिक्षा व ट्रॅक्टर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. आज सकाळी 10 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. (Satara Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?
सुवर्ण सुरेश महारुगडे, सुरेश सखाराम महारुगडे, समीक्षा सुरेश महारुगडे (सर्व राहणार पनुंद्रे तालुका शाहुवाडी
जिल्हा कोल्हापूर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर मुलगा समर्थ सुरेश महारुगडे हा गंभीर
जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महारूगडे कुटुंबीय हे मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्‍यातील आहेत. सध्या ते पुण्यात राहतात.
महारूगडे कुटुंबीय पणुंद्रे तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथे गावच्या यात्रेसाठी पुण्याहून रिक्षाने पणुंद्रेकडे
जात होते. यादरम्यान काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस
तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Web Title : Satara Crime News | karad there was a terrible accident 3 people from the same family in kolhapur district were killed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

TDM Movie | ‘टीडीएम’ चित्रपटात ‘पिंगळा’ गाणार राजा शिवरायांची गाथा; ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’च्या अभूतपूर्व यशानंतर भाऊराव कऱ्हाडेंच्या ‘टीडीएम’ चित्रपटात शुभचिंतन देणारा ‘पिंगळा’ ऐकवतोय राजा शिवबाची कथा

Sangli Crime News | विहिरीच्या पाण्यावरून झालेला वाद काका-पुतण्याच्या जीवावर बेतला; सांगलीमधील घटना