Satara Crime News | साताऱ्यातील मटकाकिंग समीर कच्छी याच्यासह त्याच्या 46 साथीदारांवर ‘मोक्का’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara Crime News | गेल्या अनेक दिवसांपासून सातारा पोलिस (Satara Police) मटकाकिंग समीर कच्छी याची कसून तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी समीर कच्छीसह त्याच्या 46 साथीदारांवर कारवाई केली आहे. ही टोळी मटका व्यवसाय, व्याजाने पैसे देऊन सावकारी करणे, टोळीमार्फत दहशत पसरवणे त्याचबरोबर आर्थिक व इतर फायद्यांसाठी अनेक विघातक कृत्य केल्याप्रकरणी यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख (SP Sameer Sheikh) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यांच्यावर चिटफंड कलम ही ठोठावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. (Satara Crime News)

19 फेब्रुवारी रोजी मोळाचा ओढा येथून पोलिसांनी समीर उर्फ शमीम सलीम शेख उर्फ कच्छी याला ताब्यात घेतले होते. यावेळी त्याच्याकडून 16 लाख 26 हजार 70 रुपयांचा मुद्देमालासह त्याच्या साथीदारांनाही ताब्यात घेतले होते. यावेळी घटनास्थळाची तपासणी केली असता समीर कच्छी त्याच्या साथीदार सोबत मटका, जुगार सारखे अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणात करत काळा पैसा जमा केल्याचे उघडकीस आले. ही जमा केलेली रक्कम गोरगरीब कुटुंबातील गरजू लोकांना बेकायदेशीर व्याजाने देऊन त्यांच्याकडून सावकारी देखील केली जायची. यातूनच काही जणांची पिवळणूक होऊन मारहाण केल्याची घटना देखील समोर आली आहे. कच्छी याच्या विरुद्ध सावकारीची तक्रार देखील सातारा पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासणी दरम्यान याचे कनेक्शन गोव्यापर्यंत असल्याचे समोर आले.

ही माहिती मिळताच सातारा पोलिसांचे एक पथक गोव्याला रवाना झाले. त्यावेळी पोलिसांनी गोवा इथून संशयितांकडून 1 लाख 39 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याचबरोबर 44 संशयित आरोपी देखील ताब्यात घेतले. संशयित हे भिशी चालवून पैशांची देवाणघेवाण करत गैरमार्गाने हे पैसे गुंतवत अवैध धंदे करत असल्याचे उघडकीस आले. यामुळे संशयितांवर चिटफंडचे कलमही ठोठावण्यात आले. सध्या 44 संशयित आणि 2 पसार असे एकूण 46 जणांचा प्रस्ताव तयार करून तो कोल्हापूर आयजी कार्यालयात पाठवण्यात आला. त्याला मंजुरी मिळाली असल्याची माहिती पोलीस प्रमुख समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Satara Crime News)

ही कारवाई करताना पाच विविध पथके तयार करण्यात आली होती. यामध्ये प्रत्यक्ष तपास, कागदपत्रांची छाननी, संशयतांची उचल बांगडी, मालमत्तेची माहिती घेऊन बँक खाते गोठणे अशी जबाबदारी त्या त्या पथकांना देण्यात आली होती आणि या सर्व पथकांवर स्वतः जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख हे लक्ष ठेवून होते. तपास, कारवाईच्या सूचना ते स्वतः या पथकांना देत होते. दररोज प्रत्येक पथकाकडून अहवाल सादर करून संपूर्ण माहिती गोळा केली जात होती. या प्रकरणी कच्छी यांचे बँक खाते जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असल्याचे आढळून आले. याचीच माहिती घेऊन ते बँक खाते बंद करण्याची सुरुवात वेगाने करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार या बँक खात्यांमधून अनेकदा 25 ते 70 लाखापर्यंत भरणा झाल्याचे उघडकीस आले आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांची हि सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. या कारवाईमध्ये 5 राज्य आणि
6 जिल्ह्यातून 46संशयिताना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात,
उत्तर प्रदेश, गोवा या राज्यांचा समावेश आहे. संशयितांमध्ये साहील ऊर्फ भय्या शमीम ऊर्फ समीर शेख (19),
अमर पकार, धनंजय कदम, अश्विन माने, नासिर हुसेन शेख, सलीम खान, शकील सय्यद, राजेश कदम,
विकास चव्हाण, संतोष माने, अक्षय सोनावणे, गजानन इरकल, किशोर साळुंखे, असद सय्यद, असिफ खान,
संतोष गुरक, प्रकाश बोभाटे, श्रीकांत पाटील, विपुल जाधक, राजेंद्र ऊर्फ राहुल निंबाळकर
(सर्व रा. सातारा परिसर व जिल्हा), विष्णू सोनटक्के (रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर),
शिवराम नारायण सुवर्णा (रा. मेंगलोर, कर्नाटक), नरेंद्र तायडे, सुमेध तायडे, गजानन तायडे, सुमेध अवचार,
पुरुषोत्तम रोजतकार (सर्क रा. जि. अकोला), यशवंत नायक (रा. गुजरात), अजय इंगोले, प्रतीक मून,
गजानन कणसे, शुभम राठोड, संतोष महाजन, सचिन खिची (सर्व रा. जि.यवतमाळ), राजन कुमार (उत्तर प्रदेश),
जयप्रकाश जयस्वाल (रा. ठाणे), अनिल मुंदडा (रा. जि.छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.

Web Title : Satara Crime News | mokka action against 46 persons including matkaking cheat fund clause also applied

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Crime News | इमारतीच्या छतावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या; मुंबईमधील घटना

Wardha Crime News | खळबळजनक ! पोलिस अधिकार्‍यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, प्रचंड खळबळ

Solapur Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Pravin Tarde | प्रवीण तरडे यांना ’कलाजीवन गौरव’ पुरस्कार