Satara Crime News | साताऱ्यातील धक्कादायक घटना ! भाजपाच्या माजी आमदाराच्या बंगल्याच्या परिसरात आढळला कुजलेला मृतदेह

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara Crime News | येथील वाढे या ठिकाणी अर्धवट पुरलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. याबाबत परिसरात खळबळ माजली आहे. येथील पोलिस मृतदेहाविषयीची माहिती घेत होते. मृतदेह जिथे आढळला तो परिसर भाजपा पक्षाच्या माजी आमदार कांताताई नलावडे यांच्या बंगल्याचा असल्याने खळबळ उडाली आहे. (Satara Crime News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा तालुक्यातील वाढे येथे भाजपा माजी आमदार नलावडे यांचा बंगला आहे. या बंगल्याच्या परिसरात शुक्रवारी (दि. ३०) अर्धवट पुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती पोलिसांना त्वरित देण्यात आली. याप्रसंगी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. (Satara Crime News)

परिसरात साफसफाई करताना कुजलेल्या अवस्थेतील अर्धवट पुरण्यात आलेला मृतदेह आढळला. त्यामुळे हा प्रकार समोर आला. हा मृतदेह महिलेचा आहे की, पुरुषाचा याबाबत ओळख पटविण्याचे काम सुरू असून, पोलीस आसपासच्या लोकांची चौकशी करत आहेत.

 

तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके हे पथकासह घटनेच्या ठिकाणी गेले.
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेहाविषयी माहिती घेण्यात येत होती.
वाढे येथे मृतदेह आढळल्याने लोकांनी गर्दी केली होती.
पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

Web Title :- Satara Crime News | partially buried body was found in the
closed bungalow of former bjp mlc kanta nalawade

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा