Satara Crime News | औषधाच्या बिलात फेरफार करत हॉस्पिटलला 62 लाखाचा गंडा; चौघांविरुद्ध FIR

पोलीसनामा ऑनलाइन : सातारा (Satara Crime News) येथील सदर बाझारमध्ये (Sadar Bazaar) एका नामांकित हॉस्पिटलची फसवणूक (Fraud) झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या हॉस्पिटलच्या अंतर्गतच मेडिकल स्टोर आहे. याच मेडिकल स्टोअर मध्ये फेरफार करत हॉस्पिटलला 62 लाखांचा गंडा (Satara Crime News) घातल्या प्रकरणी हॉस्पिटल व्यवस्थापनाने मेडिकल स्टोरच्या कर्मचाऱ्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात (Satara City Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून विक्रमसिंह सतीश शिंदे यांनी फिर्याद देत निलेश भानुदास नाईक उर्फ इग्नसी सॅनटन फर्नांडिस, प्रिया निलेश नाईक, सर्जिमेड एजन्सीचे रविकिरण विलास पाटील, अजित रामचंद्र कुलकर्णी अशा चार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांनी मिळून संगनमताने मेडिकल स्टोर मध्ये तफावत करत हॉस्पिटलचे 62 लाख 77 हजार 542 रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप या संशयतांवर करण्यात आला आहे. मेडिकल स्टोर चे काम पाहण्यासाठी हॉस्पिटल व्यवस्थापनाने निलेश नाईक उर्फ इग्नसी फर्नांडिस याची नेमणूक केलेली होती. तर मेडिकलमधील आर्थिक व्यवहाराच्या नोंदी प्रिया नाईक या करत होत्या. दरवर्षी वर्षाच्या अखेरीस मेडिकल मधील शिल्लक औषध साठा व विक्रीचा ताळमेळ घेण्यात येतो. यंदाच्या वेळी हे ताळमेळ करत असताना शिल्लक साठा व विक्री रक्कम यात तफावत आढळून आली. यानंतर हि संपूर्ण घटना उघडकीस आली.

शिल्लक साठा आणि विक्री रक्कम याची तफावत आढळून आल्याने खरेदी विक्री सॉफ्टवेअरची तपासणी
हॉस्पिटल व्यवस्थापनाने केली. यावेळी व्यवहाराच्या नोंदी डिलीट केल्याचे उघडकीस आले.
एवढेच नाही तर काही नोंदीत बदल केल्याचे आणि विक्रीतून जमा झालेली रोकड रक्कम हॉस्पिटलमध्ये जमा
न केल्याचे त्याचबरोबर पुरवठादारांना औषधे परत केल्याच्या बनावट पावत्या देखील समोर आल्या आहेत.
तर जमा आणि रजिस्टर मधील आर्थिक नोंदी तफावत असल्याचे बँकेत रोकडीचा कमी भरणा केल्याने औषधांची खरेदी जादा किमतीने केल्याचे निदर्शनास आले. ही संपूर्ण बाब उघडकीस आल्यानंतर निलेश नाईक यांच्यासह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये हॉस्पिटलची 62 लाख 77 हजार 542 रुपयांची फसवणूक झाली आहे.

Web Title : Satara Crime News | satara medical store hospital manipulating records 62 lakhs fraud case against four

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | संजय गायकवाडांच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अजित पवार संतप्त, म्हणाले- ‘…तर राज्य चालवणं कठीण होईल’ (व्हिडिओ)

Popatrao Gawade | राष्ट्रवादीचे माजी आमदार, शरद पवारांचे निकटवर्तीय पोपटराव गावडे रूबी हॉलमध्ये दाखल, उपचार सुरू

Pune Crime Suicide News | भाजप नेत्याच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीची पुण्यात आत्महत्या