Satara Crime | सांगलीतील उद्योजकाच्या मुलाचा मृतदेह आढळला नीरा नदीत; पुण्यातून झाला होता बेपत्ता

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – Satara Crime | सांगली येथील प्रसिद्ध उद्योजक सुमेध शहा (Sumedh Shah) यांचा मुलगा सौमित शहा Saumeet Shah (वय २३) याचा शिरवळ जवळील निरा नदीच्या (Nira River) पात्रात रविवारी मृतदेह (Dead Body) आढळून आला. सौमित शहा हा शनिवारी पुण्यात आला होता. एका हॉटेलमध्ये मित्रांबरोबर जेवणास गेला असताना तेथून मित्रांना पाच मिनिटात येतो, असे सांगून बाहेर गेला तो गेलाच. त्याचा मृतदेहच नीरा नदीत सापडल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (Satara Crime)

याबाबत पोलिसांनी (Satara Police) दिलेल्या माहितीनुसार, सौमित शहा हा शनिवारी दुपारी चार मित्रांबरोबर कारने पुण्याला गेला होता. पुण्यातील एका हॉटेलमध्ये सर्व मित्र जेवायला थांबले होते. त्यावेळी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सौमितने मित्रांना पाच मिनिटांत येतो, असे सांगून तो कार घेऊन निघून गेला होता. बराच वेळ झाला तरी तो परत न आल्याने त्यांच्या मित्रांनी त्याला फोन केला. तेव्हा त्याचा आवाज घाबरलेल्या स्थितीत होता. त्यानंतर त्याने ‘हेल्प’ असा मेसेज त्याच्या मित्रांना पाठवला होता. त्यामुळे मित्रांनी सांगलीतील घरी या प्रकाराची माहिती दिली. नातेवाईकांनी रात्री उशिरा पर्यंत सौमितचा शोध घेतला. तरी तो सापडला नाही.

गाडी सापडली फार्म हाऊसजवळ
सौमित पुण्यातून जी गाडी घेऊन गेला होता. ती गाडी निरा नदीच्या काठाला असलेल्या एका फार्म हाऊसजवळ (Farm House) सापडली आहे. या गाडीमध्ये काही कागदपत्रेही आहेत. सोमवारी सकाळी फॉरेन्सिक तज्ञ आणि डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले असून त्यातून वस्तूस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Satara Crime)

सौमित याचा शोध सुरु असतानाच त्याचा मृतदेह निरा नदीत आढळून आला. शहा यांचा सांगली शहरात
सुनील फ्लेक्स प्रिटिंग (Sunil Flex Printing) या नावाने व्यवसाय आहे.
या घटनेने सांगली शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title :- Satara Crime | Sangli entrepreneur’s son’s body found in Neera river; He went missing from Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

T20 World Cup | सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्याअगोदर संघात करणार ‘हा’ एक बदल

Andheri Bypoll Result | ‘नोटा’ वरुन ठाकरे गटाची भाजपवर टीका, शिंदे गटाच्या मंत्र्याने दिले प्रत्युत्तर, म्हणाले-‘…तर वेगळे निकाल…’