Satara Crime | सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ‘राडा’ ! पोलिस अधिकाऱ्याची कॉलर पकडून मारहाण

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara Crime | सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात (Satara District Central Jail) बंदिस्त असणाऱ्या आरोपीने पोलिसाची कॉलर धरुन (Satara Crime) मारहाण केली आहे. या प्रकारामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. काशीनाथ उर्फ काश्या सोनबा जाधव (Kashinath Alias Kashya Sonba Jadhav) (वय 37, रा. आंधळी ता. माण) याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात (Satara City Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणी जेल पोलिस रणजित गोपीचंद बर्गे (Ranjit Gopichand Barge) (वय 40) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिनांक 9 व 10 रोजी अशा दोन टप्प्यात याबाबत घटना (Satara Crime) घडली. 9 फेब्रुवारी रोजी दुपारी तक्रारदार रणजित बर्गे जेलमध्ये कर्तव्य बजावत असताना संशयिताने ‘तुला लय मस्ती आली. तुझ्याकडे बघतो’, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देवून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

 

दरम्यान, इतर पोलिसांनी धाव घेवून संशयिताला ताब्यात घेतले आहे.
या घटनेबाबत माहिती कारागृह अधीक्षक (Jail Superintendent) यांना दिल्यानंतर त्यांनी 10 फेब्रुवारी रोजी संबंधित पोलिस आणि संशयिताला कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले.
यानंतर प्राथमिक चौकशी दरम्यान, पुन्हा संशयित आरोपी काशीनाथने जेल पोलिस रणजित बर्गे यांची कॉलर धरत धक्काबुक्की केली.
शेवटी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

 

Web Title :- Satara Crime | Satara District Central Jail Satara Police City Police Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा