Satara Crime | साताऱ्यात पत्नीची पतीविरोधात पोलिसांत धाव; तो तिला विवस्त्र…

सातारा: पोलीसनामा ऑनलाइन – साताऱ्यात पतीच आपल्या पत्नीचा लैंगिक छळ (Satara Crime) करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे पत्नीने पतीच्या विरोधात पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. पती कामानिमित्त बाहेरगावी होता. तो रात्रीच्या वेळी पत्नीला फोनवरून विवस्त्र फोटो पाठवण्यास भाग पाडत असे. तसेच हा विकृत पती सतत अनैसर्गिक कृत्ये करून आपल्या पत्नीचा लैंगिक छळ करत होता. त्यामुळे त्रासाला कंटाळून पत्नीने पतीच्या विरोधात पोलिसांत (Satara Crime) धाव घेतली आहे.

शाहुपुरी पोलीस ठाण्यात या महिलेने तक्रार दिली आहे. पिडीत विवाहीता 24 वर्षांची असून, ती आपल्या पतीसोबत पुण्यात राहत होती. तिचा पती घराबाहेर गेल्यानंतर अनेकवेळा पत्नीला फोन करायचा आणि तुझे विवस्त्र फोटो पाठव म्हणून जबरदस्ती करायचा. पत्नी भितीपोटी त्याला मोबाईलवर फोटो पाठवत होती. पती विवस्त्र अवस्थेत तिला झोपण्यास भाग पाडत होता. अखेर त्रासाला कंटाळून पत्नीने शाहुपुरी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली आहे.

विवाहीतेला पतीचा त्रास सुरूच होता. तो तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्ये करत होता.
तिचा एकप्रकारे अनैसर्गिक छळच सुरू होता. तसेच तिचे सासू, सासरे देखील तिला छळत होते.
त्यामुळे या विकृत लोकांना कंटाळून अखेर ती विवाहीता साताऱ्याला निघून गेली.
त्यानंतर तिने शाहुपुरी पोलिसांत या प्रकाराची तक्रार दिली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title :- Satara Crime | satara husband used to tell his wife to send you naked photos at night sataras married woman in the sahupuri police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाही आलेली नाही, त्यामुळे सरकार आमच्या…’ – संजय राऊत

Winter Care | हिवाळ्यात मुलांची घ्या विशेष काळजी, जाणून घ्या कसे ठेवावे गरम आणि आजारांपासून सुरक्षित

Health Tips | जेवल्यानंतर ताबडतोब झोपण्याची सवय आहे का? मग व्हा सावध! होऊ शकतात हे गंभीर आजार