Satara Crime | नववीत शिकणाऱ्या 2 विद्यार्थिनींची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये सांगितलं धक्कादायक कारण

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara Crime | सातारा जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. नववीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थीनींनी आत्महत्या केली (Suicide in Satara) आहे. यातील एका विद्यार्थिनीने सुसाइड नोट (Suicide Note) लिहून ठेवली होती. यात आत्महत्येमागील धक्कादायक कारण उघड झालं आहे. या दोन घटनांमुळे संपूर्ण सातारा जिल्हा (Satara Crime) हादरुन गेला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील (Satara Crime) शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या (Shahupuri Police Station) हद्दीत ही घटना घडली आहे. शाहूपुरी येथे नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने (9th Standard Girl Student) घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘सेमी इंग्लिश मीडियम नको’ (Semi English Medium) म्हणून तीने हे टोकाचे पाऊल उचलले. शाहूपुरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली.

 

मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले की, माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नका.
सेमी इग्लिश मीडियम नको असल्याने मी आत्महत्या करत आहे, असे तिने चिठ्ठित लिहून ठेवले होते.
या मुलीने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केली त्यावेळी मुलगी घरात एकटीच होती.

मलकापूरमध्ये मुलीची आत्महत्या
साताऱ्यातील शाहुपुरीतील घटना ताजी असतानाच मलकापूर मध्ये (Malkapur) अशीच घटना उघडकीस आली आहे.
कराड (Karad) येथील मलकापूरमध्ये एका विद्यार्थीनेने घरातील छताच्या लोखंडी हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही मुलगी इयत्ता नववीत शिकत होती. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
दोन अल्पवयीन मुलींनी केलेल्या या आत्महत्यांमुळे सातारा शहर आणि मलकापूर परिसरात खळबळ उडाली आहे.

 

Web Title :- Satara Crime | two 9th standard girl student ends life in shahupuri and malkapur area in karad of satara district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक! राज्यात गेल्या 24 तासात 50,142 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

PM Kisan Scheme | 63 लाख शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर! आता मोदी सरकार देईल पूर्ण 16,000 रुपये, जाणून घ्या काय आहे प्लान?

 

PMSBY | दर महिना केवळ 1 रुपया जमा करून घेऊ शकता 2 लाखाच्या सुविधेचा फायदा, जाणून घ्या कसा?