Satara Crime | ‘चंदेरी’ दुनियेत स्थान न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या; प्रचंड खळबळ

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara Crime | बालपणापासून चित्रपटात काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका तरुणाला चंदेरी दुनियेत स्थान (Film Industry) मिळाले नसल्याने नैराश्य आलं. यातूनच या तरुणाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सातारा जिल्ह्यातील (Satara Crime) फलटण तालुक्यातील (Phaltan Taluka) गोखळीपाटी येथे 2 जानेवारी रोजी घडली आहे.

 

अतुल राजेंद्र शिंदे Atul Rajendra Shinde (वय-29) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अतुल याने यु ट्यूबवरील एका छोट्या बेवसीरीजमध्ये (Youtube Short Video) काम केले. एक दिवस आणप नक्कीच चित्रपटात हिरो (Hero) म्हणून काम करणार, असं तो आपल्या घरच्यांना आणि मित्रांना सांगायचा पण त्याला संधी काही मिळाली नाही. चित्रपटात हिरो बनन्याचं त्याचं स्वप्न (Dream) अपूर्णचं राहत असल्याचे लक्षात येताच त्याने टोकाचं पाऊल उचललं. (Satara Crime)

अतुल शिंदे हा आपला छंद जोपासत एका गॅरेजमध्ये (Garage) काम करत होता. आपल्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळेल. अशा आशेवर तो होता. मात्र संधी मिळत नसल्याने तो नैराश्यात होता. तो सतत विचार करत असायचा. यातूनच त्याने गोखळी पाटीजवळील एका विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना त्याच्या घरच्यांना आणि मित्रांना समजताच त्यांना मोठा धक्का बसला.

 

अतूल हा सतत सोशल मीडियावर (Social Media) सक्रीय (Active) असायचा.
आपल्याला एक ना एक दिवस चित्रपटात काम मिळेल आणि आपले स्वप्न पूर्ण होईल,
आपल्याला गॅरेजमध्ये काम करावे लागणार नाही, असं त्याला वाटत होतं. पण स्वप्नांचा पाठलाग करण्यापूर्वीच त्यानं स्वत:चं आयुष्य संपवलं.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात (Phaltan Rural Police Station) या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :-  Satara Crime | youth suicide in satara

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

US President Joe Biden | आयसिसचा म्होरक्या अल-हाशिमी अल-कुरेशीचा ‘खात्मा’, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची घोषणा

 

World Cancer Day 2022 | कॅन्सरचा धोका वाढवू शकतात ‘या’ 5 गोष्टी, आजपासूनच सेवन करा बंद, जाणून घ्या

 

World Cancer Day 2022 | पुरुषांमध्ये ‘ही’ 10 लक्षणे असू शकतात कॅन्सरचा संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या