देवीच्या मंदिरावरील झेंडा बदलताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

मेढा (सातारा) : पोलीसनामा ऑनलाईन 

जावळी तालुक्यातील करंजे येथे मरिआईच्या मंदिरावरील झेंडा बदलण्यासाठी गेलेल्या भगवान ज्ञानेश्वर धनवडे (वय ५९) यांना विजेचा झटका बसल्याने जागीच मृत्यू झाला, तर अक्षय नामदेव करंजेकर (रा. मेढा) हा युवक जखमी झाला. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20bc003b-cbde-11e8-9bd4-e32f83112505′]

याबाबत माहिती अशी की, नवरात्रीनिमित्त करंजे येथील मरिआई मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यानिमित्त देवळाची साफसफाई केली जाते. मंगळवारी सकाळी मंदिरावरील झेंडा बदलण्यासाठी भगवान धनवडे व अक्षय करंजेकर हे दोघेजण मंदिरावर चढले.
[amazon_link asins=’B06XN6BY5V,B07DDKXBFB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’31487311-cbde-11e8-af85-7fcec8b88631′]

यावेळी मंदिरावरील झेंडा असलेला लोखंडी पाईप भगवान धनवडे व अक्षय करंजेकर हे दोघेजण खाली उतरवत असताना लोखंडी पाईपचा धक्का शेजारी असलेल्या विजेच्या खांबावरील तारेला लागला. यावेळी हा पाईप धनवडे यांच्या हातात असल्याने विजेचा झटका बसून धनवडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षय करंजेकर हा फेकला जाऊन जखमी झाला.

पुणे : उपोषनाला बसलेल्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थी संतप्त

बिअर पिण्यास नकार दिल्याने युवकाला मारहाण

पुणे  :  बिअर पिण्यास नकार दिल्याने एका युवकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून मारहाण केली. हा प्रकार रविवारी (दि.७) रात्री दहाच्या सुमारास मुंढवा येथील केशवनगरमध्ये घडला. याप्रकरणी रमजान बादशाह शेख याला अटक करण्यात आली आहे. तर सुनिलकुमार पासवान याने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिलिी आहे. रविवारी रात्री रमजान आणि सुनिलकुमार हे दोघे केशवनगर येथील गायकवड वस्तीमध्ये बिअर पित बसले होते. त्यावेळी रमजान याने सुनिलकुमारला बिअर पिण्याचा अग्रह केला. मात्र, बिअर पिण्यास नकार दिल्याने रमजान याने त्याच्या डोक्यात बाटली फोडून जखमी केले. या घटनेत सुनिलकुमार याच्या कानावर, पोटावर जखमा झाल्या आहेत. पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.