Satara District Bank Election | भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा जिल्हा बँक निवडणूक निकालानंतर (Satara District Bank Election) आता अध्यक्षपदासाठी (chairman) नेत्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे धाव घेऊन आपली इच्छा व्यक्त केली आहे तर काहींनी दबाव तंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (shivendra raje bhosale) यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे. (Satara District Bank Election)

सूत्रांच्या माहितीनुसार, सिल्वर ओक या निवासस्थानी आमदार भोसले यांनी पवारांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत चर्चा केली असून आपल्याला अध्यक्षपद मिळावे अशी इच्छाही शिवेंद्रराजेंनी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गुरुवारी मंत्रालयात शिवेंद्रराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचीही भेट घेतली. त्यावेळीही त्यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे अजित पवारांना सांगितल्याचे समजते. शिवेंद्रराजेच्या भेटीगाठीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तर दुसरीकडे आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्या पराभवामागे शिवेंद्रराजे भोसले यांचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे (mla shashikant shinde) यांचा एका मताने पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेत आपल्या पराभवामागचं (Satara District Bank Election) कारणही सांगितलं. माझा गाफीलपणा नडला ही वस्तुस्थिती आहे अशी प्रतिक्रिया देत मला पाडण्यात संपुर्णपणे शिवेंद्रराजे भोसले यांचा हात आहे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी त्यांना मदत केल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता. साताऱ्यातील मुख्य नेतेच विरोधकांना सोबत घेवून खलबत करतात त्यामुळे राष्ट्रवादीच्या भवितव्याला मोठा धोका निर्माण झाला असल्याचं शिंदे यांनी म्हंटल होत. त्यावेळी त्यांचा रोख हा रामराजे नाईक निंबाळकर (ramraje naik nimbalkar) यांच्याकडे होता.

Web Title : Satara District Bank Election | bjp mla shivendra raje bhosale meet sharad pawar regarding satara district bank election chairman post

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये