Satara District Bank Election | सातार्‍यात महाविकास आघाडीला जबरदस्त धक्का ! गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, शशिकांत शिंदे पराभूत; राष्ट्रवादीच्या आमदाराचा 1 मतानं केला ‘घात’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara District Bank Election | सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) मोठा धक्का बसला असून गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई (Shambhuraj Desai), राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (NCP MLA Shashikant Shinde ) हे पराभूत झाले आहेत. (Satara District Bank Election) शशिकांत शिंदे यांचा केवळ १ मतांनी पराभव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा धक्का बसला आहे.

पाटणमध्ये (Patan) शंभुराज देसाई व पाटणकर हे परस्परांचे विरोधक. पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर (Vikramsinh Patankar) यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर (Satyajeet Singh Patankar) यांनी ५८ मते मिळवून गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (Minister of State for Home Affairs shambhuraj desai) यांचा पराभव केला.

जावळी (jawali ) सेवा विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा १ मताने धक्कादायक पराभव झाला. तेथे विरोधी ज्ञानदेव रांजणे (Gyandev Ranjane) विजयी झाले आहेत. शशिकांत शिंदे यांना २४ मते मिळाली तर रांजणे यांना २५ मते मिळाली.

सातारा जिल्हा बँकेच्या  २१ जागांसाठी ही निवडणूक होती.
त्यापैकी आमदार शिवेंद्रसिंह राजेंसह (Shivendraraje Bhosale) १० जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
रविवारी ११ जागांसाठी मतदान पार पडले होते. त्याची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली. त्यातील पहिलाच निकाल शशिकांत शिंदे यांचा आला.

Web Title :- Satara District Bank Election | Minister of State for
Home Affairs Shambhuraj Desai and Shashikant Shinde losse
in Satara District Bank Election while
Vikramsinh Patankar and Gyandev Ranjane are won

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sitaram Kunte | ठाकरे सरकारचा निर्णय ! राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ वाढवला

PMC Bank चे USFB मध्ये होणार विलीनीकरण, ‘पीएमसी’च्या ग्राहकांना 10 वर्षात मिळणार पूर्ण पैसे

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 768 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corporation | ATM System मधील कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराची ED कडे तक्रार करण्याची गर्जना करणारे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रस्ताव मंजुरीच्यावेळी सभागृहातून ‘गायब’ ! राष्ट्रवादी कॉंग्रेसने ‘युटर्न’ घेत दिली भाजपला साथ