Homeताज्या बातम्याSatara District Bank Election | 'माझी शिफारस नसल्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले...

Satara District Bank Election | ‘माझी शिफारस नसल्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत’ – शशिकांत शिंदे

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara District Bank Election | मागील काही दिवसात सातारा जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीची चर्चा चांगलीच रंगली होती. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे (NCP) आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) आणि गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांना या निवडणुकीत धक्का बसला. शिंदेंच्या पराभवानंतर अध्यक्षपदासाठी भाजपचे (BJP) आमदार शिवेंद्रराजें भोसले (MLA Shivendra Raje Bhosle) यांच्या नावाची चर्चा सुरु होती. अखेर त्यांच्याकडे अध्यक्षपद आलं नाही. यावरुन शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Satara District Bank Election)

 

शशिकांत शिंदे म्हणाले, ‘शरद पवारांनी अध्यक्षपदाची माळ आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ नितीन पाटील (Nitin Patil) यांच्या गळ्यात टाकली आहे. यावर माझी शिफारस नसल्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष बनू शकले नाहीत,’ असा टोला शशिकांत शिंदेंनी (MLA Shashikant Shinde) लगावला.

 

जावळी मतदारसंघातून शशिकांत शिंदे अवघ्या एका मताच्या फरकाने पराभूत झाले. यावरुन बोलताना शिंदे म्हणाले, ‘माझ्या पराभवानंतर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. पवार साहेबांनी त्या भावना ओळखल्या आणि म्हणूनच नितीन पाटलांना (Nitin Patil) अध्यक्ष केलं. मी निवडून आलो असतो तर शिवेंद्रराजेंची शिफारस मी पवार साहेबांकडे करु शकलो असतो. याआधी शिवेंद्रराजे जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा मीच त्यांची शिफारस केली होती. परंतू यावेळी माझाच पराभव झाल्यामुळे माझी शिफारस कमी पडल्यामुळे शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत.

दरम्यान, शिवेंद्रराजेंना (MLA Shivendra Raje Bhosle) अध्यक्ष करु नका असं मी कधीच सांगितलं नाही,
असं शिशिकांत शिंदेंनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी पक्ष साताऱ्यात टिकवायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन काम करणं आवश्यक आहे.
पक्षाने आदेश दिला तर मी जावळीत नक्कीच रान पेटवेन असं म्हणत शिंदेनी थेट शिवेंद्रराजेंना आव्हान दिलंय.

 

Web Title :- Satara District Bank Election | satara district bank election ncp mlc shashikant shinde taunts bjp mla shivsendraraje bhosle on chairmanship post

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत दररोज 334 रुपयांची गुंतवणूक ! काही वर्षात मिळू शकते 15 लाखापेक्षा जास्त रक्कम, समजून घ्या – गणित

Bigg Boss 15 | देवोलिनामुळे राखी सावंत आणि तिचा पती रितेशच्या नात्यात आली ‘दरार’ ! राखीने बजावलं रितेशला, म्हणाली…

तुमचे Corona Vaccine Certificate बनावट तर नाही ना? अशाप्रकारे CoWIN पोर्टलवर करू शकता चेक

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News