Satara District Bank | सातारा जिल्हा बँकेत वेगळंच चित्र ! राष्ट्रवादी देणार भाजपला अध्यक्षपद?

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara District Bank | काही जिल्ह्यातील जिल्हा बॅकेच्या निवडणुका नुकतंच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये काही जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्र लढले आहेत. मात्र, सातारा जिल्हा बँकामध्ये (Satara District Bank) म्हणजेच राष्ट्रवादीच्या (NCP) बालेकिल्ल्यात वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे. सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्षपद (Chairman of District Bank) भाजपचे (BJP) विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांच्याकडे देण्याची चर्चा सध्या राष्ट्रवादीच्या गोटात सुरु आहे.

 

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची शिवेंद्रराजे भोसले यांनी ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी शरद पवार यांनी शिवेंद्रराजे यांच कौतुक केल्याचं समजतं. ‘शिवेंद्रराजे आपण बँक उत्तम चालविली आहे. अगदी भाऊसाहेब महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण काम करताय, असं पवार यांनी म्हटलं होतं. त्यावेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाबाबतही चर्चा झाल्याचं समजतं. तसेच, बँकेत कोणतंही राजकारण न आणता सगळ्यांना सोबत घेऊन कारभार केल्याचं शिवेंद्रराजेंनी पवारांना सांगितलं. त्याचबरोबर अध्यक्षपद मिळावं असं सांगितल्याचंही सूत्रांकडून समजते. (Satara District Bank)

तसेच, काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजेंनी (Shivendraraje Bhosale) अजित पवार (Ajit Pawar) यांचीही भेट घेतली होती.
या भेटीत शिवेंद्रराजे यांच्या अध्यक्षपदासाठी चर्चा झाल्याचं समजते.
दरम्यान, शरद पवार यांच्या भेटीच्या वेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेगवेगळ्या विषयांबाबतही चर्चा झाल्याचं म्हटलं जातंय.
तर, रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि अजित पवार यांच्या सोबत बोलून घेतो, असं शरद पवार यांनी शिवेंद्रराजेंना सांगितलं.
सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी इच्छा व्यक्त केलीय.
परंतु, शिवेंद्रराजे भोसले यांनी अध्यक्षपदासाठी फिल्डींग लावल्याची चर्चा आहे.
दरम्यान, याबाबत शरद पवार (Sharad Pawar) काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे आहे.

 

Web Title :- Satara District Bank | satara bank chairman election ncp may give chance to bjp mla shivendra raje bhosale

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

LIC Kanyadan Policy | ‘या’ योजनेत केवळ 121 रुपये जमा करा, मुलीच्या विवाहासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे

Pune Crime | सुरक्षारक्षकाने ज्वेलर्समध्ये शिरुन 12 लाखांचा ऐवज नेला चोरुन; भिंतीला भोक पाडून शिरला दुकानात, पत्नीसह गेला पळून

Ilenana D’Cruz | इलियानाने मालदीवजमध्ये लाल बिकनीमध्ये लावली आग, बिकनीची किंमत आहे ‘इतकी’

KVP | ‘ही’ योजना शेतकर्‍यांसाठी अतिशय खास, यामध्ये थेट दुप्पट होतील पैसे; जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?