Satara Fire News | शाळकरी विद्यार्थ्यांच्या व्हॅनने अचानक घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – Satara Fire News | सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील वाठार कॉलनी येथील हायस्कूलची मुलं शाळेत घेऊन जात असलेल्या एका स्कूल व्हॅनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना लोणंद शिरवळ रोडवरील शेडगेवाडी फाट्याजवळ घडली आहे. या व्हॅनमध्ये शेडगेवाडी येथील 8 ते 10 विद्यार्थी होते. (Satara Fire News)

या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याचे लक्षात येताच वाहन चालकाने प्रसंगावधान राखून गाडीतील सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, या आगीत स्कूल व्हॅन संपूर्ण जळून खाक झाली आहे. या स्कूल व्हॅनचा चालक हा वाठार कॉलनी येथील हायस्कूलचा शिपाई आहे. या घटनेमुळे आता पुन्हा एकदा स्कूल व्हॅनच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Satara Fire News)

काही महिन्यांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील बेसा घोगली रोडवर आज सकाळच्या सुमारास स्कूल व्हॅन नाल्यात पडल्याची
घटना घडली होती. या अपघातावेळी व्हॅनमध्ये 18 शाळकरी विद्यार्थी होते.
यामध्ये तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले होते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला होता.

Web Title :- Satara Fire News | school bus bursts into flames in sangli khandala disaster averted by drivers intervention watch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | धनकवडीत स्पेशल 26 च्या स्टाईलने घातली ‘धाड’; खोटा गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवून अ‍ॅन्टी करप्शनच्या नावाने आणि न्यूज रिपोर्टर असल्याचे सांगून लुबाडले

Chhatrapati Sambhajinagar | नामांतरानंतर छत्रपती संभाजीनगर ‘या’ कारणाने देशात आघाडीवर

Pune ACB Trap | जलसंपदा विभागाचा उपविभागीय अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; ७ लाखांची लाच मागून साडेतीन लाख घेताना…