Satara Flood | सातारा जिल्ह्यातील मृतांची संख्या 37 वर, अद्यापही 5 जण बेपत्ता

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दरडी कोसळून, पुराच्या (Satara Flood) पाण्यामुळे व अतिवृष्टीमुळे (heavy rain) घडलेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 37 जणांच मृत्यू (37 people died) झाला आहे. तर पाच जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सातारा (Satara Flood) जिल्ह्यात विविध ठिकाणी मदतकार्य, शोध मोहिम व बचाव कार्य वेगाने सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने (district administration) दिली आहे.

सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाई, पाटण, महाबळेश्वर, सातार, जावली तालुक्यातील भूस्खलनामुळे (landslide) 26 जण, छत पडून 1 जण, दरड कोसळल्याने 2 जण तर पुराच्या पाण्यामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा एकूण 37 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी दिली. वाई तालुक्यातील तीन जण, जावली तालुक्यातील चार जण, पाटण तालुक्यातील 27 जण, सातारा तालुक्यातील दोन जण तर महाबळेश्वर तालुक्यातील एक जणाचा मृतांमध्ये समावेश आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

वाई तालुक्यातील कोंढवळे येथील 2 महिलांचा भूस्खलनामुळे, तर एका पुरुषाचा छत पडून मृत्यू झाला आहे.
जावली तालुक्यातील रेंगडी येथील 2 महिला व वाटंबे येथील 1 पुरुष तर मेढा येथील 1 पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाला आहे. पाटण तालुक्यातील बोंदी येथील 1 पुरुष, जवळ येथील 1 पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाला आहे.
मंद्रुळकोळे येथील एका पुरुषाचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला आहे.
आंबेघर तर्फ मरळी येथील 5 पुरुष व 6 महिलांचा तर काहीर येतील 1 महिलेचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला आहे.
रिसवड येथील 2 पुरुष व 2 महिलांचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील घावरी येथील 1 पुरुषाचा दरड कोसळून मृत्यू झाला आहे.

पाटण तालुक्यातील भुस्खलनामुळे गाडले गेलेल्या लोकांचा शोध व बचाव काम सुरु असून अद्यापही अंदाजे 5 नागरिक बेपत्ता (5 people missing) आहेत.
तर जावली व वाई तालुक्यातील प्रत्येकी दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेले असून,
त्यांचा शोध घेण्याचे काम प्रगतीपथावर सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

Web Title :- Satara Flood | a total of 37 people died in satara district due to landslide floods and other rain related incidents

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

EPFO | घरबसल्या नोंदवा EPF आणि EPS अकाऊंटसाठी वारसदाराचं नाव, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या संपुर्ण प्रोसेस

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,843 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mumbai Police Recruitment 2021 | मुंबई पोलीस दलात विधि अधिकारी पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख