Satara Hill Half Marathon Competition | दुर्दैवी ! सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत धावतांना कोल्हापूरच्या राष्ट्रीय टेबल टेनिसपटूचा मृत्यू

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड (Guinness Book of World Records) मध्ये नोंद झालेल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे (Satara Hill Half Marathon Competition) आयोजन करण्यात आले होते. सातारा रनर्स फाऊंडेशनच्यावतीने (Satara Runners Foundation) दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. कोरोनानंतर सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे (Satara Hill Half Marathon Competition) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (District Collector Ruchesh Jaywanshi), जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल (SP Ajay Kumar Bansal) यांनी झेंडा दाखवून केले. या स्पर्धेत सात हजाराहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. दुर्दैवाने स्पर्धेमध्ये धावत असताना कोल्हापूरच्या राज क्रांतीलाल पटेल Raj Krantilal Patel (वय-32 रा. मार्केट यार्ड, कोल्हापूर) या स्पर्धकाचा मृत्यू झाला. राज पटेल हा राष्ट्रीय पातळीवरील टेबल टेनिस खेळाडू (National Table Tennis Player) म्हणून परिचित होता.

 

सातारा हिल हाफ मॅरेथॉनला (Satara Hill Half Marathon Competition) दिमाखात सुरुवात झाली. स्पर्धेत राज पटेल पुन्हा माघारी येत असताना अचानक धावमार्गावर पडला. ही घटना समोर येताच त्याला तातडीने मॅरेथॉन संयोजकांनी यशवंत हॉस्पिटलमध्ये (Yashwant Hospital) उपचारासाठी दाखल केले. मात्र हॉस्पिटलमद्ये पोहचण्यापूर्वीच राज पटेल याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर राज याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात (District Hospital) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेची माहिती तात्काळ त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली. दरम्यान आणखी तीन स्पर्धक जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मॅरेथॉन स्पर्धेचा प्रारंभ पोलीस परेड ग्राउंड येथून झाल्यानंतर ही स्पर्धा पोवई नाका, रयत शिक्षण संस्था, नगर परिषद,
अदालत वाडा, समर्थ मंदिर, बोगदा, पॉवर हाऊस, यवतेश्वर घाटातून, हॉटेल निवांत, प्रकृती आयुर्वेदिक हिल रिसॉर्ट
व नित्यमुक्त साई रिझॉर्ट पर्यंत जाऊन पुन्हा त्याच मार्गाने पोलीस परेड ग्राऊंड अशी होत आहे.
मात्र, या स्पर्धेदरम्यान, एका धावपटूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली.
तरुण खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संयोजकांनी व साताराकरांनी हळहळ व्यक्त केली आहे.

 

Web Title :- Satara Hill Half Marathon Competition | youth from kolhapur died while running in the marathon competition in satara

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PM Kisan Yojana | पीएम किसानच्या पुढील हप्त्याबाबत आली नवीन अपडेट, कधी येणार तुमच्या खात्यात पैसे?

Pune Crime | अमूल डेअरीची डिस्ट्रीब्युशनशीप मिळवून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला 10 लाखांना गंडा

Flying Bike Video | स्वप्न नाही सत्य, ही आहे जगातील पहिली उडणारी बाईक, टॉप स्पीड- 100 kph