सातारा ठरला देशातील सर्वांत स्वच्छ जिल्हा 

नवी दिल्ली  :  वृत्तसंस्था 

सैनिकांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.  स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ग्रामीण मध्ये सातारा जिल्ह्याने देशात सर्वांत स्वच्छ जिल्हा होण्याचा मान मिळवला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’85a9e3c1-c23c-11e8-b179-c10ab2c3c59c’]

केंद्र पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे स्वच्छतेबाबत गुणांकन ठरविण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक मानांकांच्या आधारे १ ते ३१ ऑगस्टदरम्यान देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम राबविण्यातआला होता .

या सर्वेक्षणात देशातील ६९८ जिल्ह्यातील ६९८० खेडी सहभागी झाली होती. ३४९०० सावर्जनिक ठिकाणांचा ज्यात शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडी बाजार, धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले. सुमारे १७४,५०० लोकांची मुलाखत आणि सुमारे ५० लाख लोकांचा अभिप्राय नोंदवण्यात आला होता.

भोकर : दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीमध्ये झालेल्या दंगलीतील ११३ आरोपीची निर्दोष मुक्तता

देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्राच्या स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्रालयाने सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये संख्यात्मक व गुणात्मक १०० गुणांचे सर्वेक्षण केले होते. सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेच्या निरीक्षणास ३० गुण, नागरिक, मुख्य प्रभावी व्यक्‍तींची स्वच्छतेबाबतची माहिती, मते व अभिप्रायास ३५ गुण व स्वच्छताविषयक सद्यःस्थितीला ३५ असे १०० गुणांकामध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात सातारा जिल्ह्याने देशात सर्वाधिक गुण मिळविले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ ऑक्‍टोबरला राष्ट्रपती भवनात हे पारितोषिक दिले जाणार आहे.

[amazon_link asins=’B01HJGT33W,B01M0KDLIW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8754264f-c23e-11e8-93f0-7d2be99e950c’]