चिमुकल्याच्या हत्येनं प्रचंड खळबळ ! 10 महिन्यांच्या मुलाचं अपहरण करून विहिरीत फेकलं

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – 10 महिन्याच्या चिमुकल्याचं अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटण तालुक्यातील काळज गावात ही घटना घडली आहे. काळज गावातील हद्दीत असलेल्या विहिरीत या 10 महिन्याच्या चिमुकल्याच्या मृतदेह सापडला आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून जाणऱ्या एका जोडप्यानं या चिमुकल्यांच अपहरण केलं होतं. यासंदर्भात सातारा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी या चिमुकल्याचा मृतदेह विहिरीत सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. ओम आदिक भगत असं या चिमुकल्याचं नाव आहे. ज्या विहिरीत ओमचा मृतदेह आढळला ती विहिर भगत कुटुंबाच्या घरापासून काहीच अंतरावर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लगेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

शेजाऱ्यांसोबत असलेल्या वादातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भगत दाम्पत्याचे शेजाऱ्यांसोबत आणि कौटुंबिक वाद असल्याची कुजबुज परिसरात सुरू आहे.

दोनच दिवसांपूर्वी चिमुकल्याचं दुचाकीवरून जाणाऱ्या जोडप्यानं अपहरण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि तपासही सुरू होता. गुरुवारी या चिमुकल्याचा मृतदेह सापडल्यानंतर आता अपहरण केलेल्या दाम्पत्यानं त्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like