खा. उदयनराजे भोसले यांचा BJP प्रवेश जवळपास ‘निश्चित’, NCP ला ‘सोडचिठ्ठी’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली असून मोठ्या प्रमाणात आमदार आणि नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्यासाठी धडपड करत आहेत. याआधी देखील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून आता राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांचा हा प्रवेश निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. काल रात्री त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन हा निर्णय नक्की केल्याचे सांगितले जात आहे.

उदयनराजे भोसले यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या जागेसाठी पोटनिवडणूक होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

शरद पवारांची खेळी ?

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी इच्छुक असून ही गळती रोखण्यासाठीच शरद पवार यांनी ही हवा निर्माण केली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. जर उदयनराजे भोसले हे पक्ष सोडून गेले तर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का समजला जात असून खासदारकीचा राजीनामा देऊन ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे फार मोठे नुकसान होणार आहे.

हे नेते देखील युतीच्या वाटेवर

याआधी अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला असून आणखी अनेक नेते शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये बार्शीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल, त्याचबरोबर करमाळा तालुक्यातील नेत्या रश्मी बागल, फलटणचे नेते रामराजे निंबाळकर त्याचबरोबर काँग्रेसचे अक्कलकोटचे आमदार सिद्धराम म्हेत्रे हे देखील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

You might also like