रामदास स्वामींनी ‘जाणता राजा’ शब्द जन्माला घातला, उपाधीसंबंधित शरद पवारांचे ‘भाष्य’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन चांगलाच वाद तापला होता. त्यानंतर भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वांवर सडेतोड टीका केली होती. यावेळी उदयनराजे यांनी शरद पवारांचे नाव न घेता टीका केली. उदयनराजे म्हणाले होते की जाणता राजा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अनेकांना जाणता राजाची उपमा दिली जाते. त्यांचा मी निषेध करतो. जाणता राजा उपमा देताना विचार करण्याची गरज आहे.

यावर आज बोलताना राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाणता राजा या उपाधीसंबंधित भाष्य केले. ते म्हणाले की रामदास स्वामी यांनी जाणता राजा हा शब्द जन्माला घातला होता. रामदास स्वामी शिवरायांचे गुरु नव्हते, शिवरायांच्या गुरु या माँसाहेब जिजामाता होत्या. यावेळी शरद पवार हे साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ आणि ‘जाणता राजा’ यावरुन राजकारण तापले होते. भाजप नेते विरुद्ध सत्ताधारी अशी जुंपली होती. या दरम्यान काल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केले होती. ते म्हणाले की कोण काय बोलते याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील सर्व प्रश्नांची उत्तर शरद पवार साहेबांकडे आहेत. म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतात. म्हणूनच काही जण सांगतात की साहेबांची करंगळी धरुन आम्ही राजकारणात आलो. जसे अनेक जण त्यांची करंगळी धरुन राजकारणात आले, तसेच अनेक जण त्यांच्यावर टीका करुन वृत्तपत्राच्या हेडलाईनमध्ये आले आहेत. त्यामुळे होय, ते जाणते राजेच आहेत. यानंतर आज खुद्द शरद पवारांनी जाणता राजा संबंधित मोठे विधान करुन वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like